शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी, जिल्हाधिकारी देसाई यांचे आदेश : क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 20:01 IST

coronavirus, collcatoroffice, kolhapurnews बंदिस्त सभागृहे, मोकळ्या जागांतील सांस्कृतिक कार्यक्रमांना मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीस अधीन राहून सुरू करण्याची परवानगी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी दिली आहे. सभागृहात क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांची उपस्थिती असणे बंधनकारक आहे.

ठळक मुद्देसार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी, जिल्हाधिकारी देसाई यांचे आदेश क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती

कोल्हापूर : बंदिस्त सभागृहे, मोकळ्या जागांतील सांस्कृतिक कार्यक्रमांना मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीस अधीन राहून सुरू करण्याची परवानगी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी दिली आहे. सभागृहात क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांची उपस्थिती असणे बंधनकारक आहे.कोरोनामुळे गेलले आठ महिने जिल्ह्यातील सभागृहांमधील व मोकळ्या जागांतील कार्यक्रमांना बंदी होती. आता ती उठवण्यात आल्याने सभा, समारंभ, मेळावे, व्याख्याने, साांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरणाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियमावली जाहीर केली असून सभागृहात प्रवेश देताना थर्मल टेस्टद्वारे प्रेक्षकांच्या शारीरिक तापमानाची चाचणी घेऊनच प्रवेश देण्यात यावे.

सभागृहाच्या ५० टक्के इतक्या मर्यादेपेक्षा प्रेक्षक संख्या जास्त असू नये. प्रेक्षकांमध्ये सामाजिक अंतर, कलाकारांची वैद्यकीय तपासणी, खोल्या, प्रसाधनगृहांची वारंवार स्वच्छता, निर्जंतुकीकरण, सर्वांनी मास्कचा वापर, साधनसामग्री वापराची दक्षता, रंगभूषाकारांना पीपीई किट धारण करणे आवश्यक आहे. बंदिस्त सभागृहात प्रवेश करतेवेळी गर्दी होणार नाही याची दक्षता आयोजकांनी घेणे आवश्यक आहे.

सभागृहात खाद्यपदार्थांची व पेय पदार्थांची पोचवणी करण्यास मनाई करण्यात आली आहे. थुंकी उत्पन्न कराणारे पदार्थ जसे की तंबाखूजन्य पदार्थ व पान हे बाळगण्यास मनाई राहील. नशा आणणाऱ्या पदार्थांचे सेवन करून कार्यक्रमाच्या ठिकाणी येता येणार नाही. थर्मल गन, सॅनिटायझर कार्यक्रमाच्या ठिकाणी असावेत व आयोजकांनी तपासणी करूनच प्रवेश द्यावा. मोकळे मैदान, रस्ता, खुले सभागृह येथे कार्यक्रम असल्यास बसण्यासाठी याकरिता मार्किंग करावे व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्यात यावे; अन्यथा संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल. 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर