शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पेरीडच्या 'त्या' महिलेच्या खात्यावर प्रलंबित १८ लाख जमा : ‘महावितरण’कडे भविष्य निर्वाह निधी , एका बातमीने सोडविला प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 01:32 IST

कोल्हापूर : पेरीड (ता. शाहूवाडी) येथील वासुदेव ठाणू कुंभार यांच्या भविष्य निर्वाह निधीचे तब्बल १८ लाख २२ हजार २४८ रुपये त्यांच्या विधवा पत्नी श्रीमती शालन कुंभार यांच्या खात्यावर दोन दिवसांपूर्वी जमा झाले.

कोल्हापूर : पेरीड (ता. शाहूवाडी) येथील वासुदेव ठाणू कुंभार यांच्या भविष्य निर्वाह निधीचे तब्बल १८ लाख २२ हजार २४८ रुपये त्यांच्या विधवा पत्नी श्रीमती शालन कुंभार यांच्या खात्यावर दोन दिवसांपूर्वी जमा झाले. ही रक्कम मिळावी म्हणून त्या गेली सव्वा चार वर्षे ‘महावितरण’च्या कार्यालयात हेलपाटे मारत होत्या. त्यांनी त्यासंबंधी साधा एक अर्ज ‘लोकमत हेल्पलाईन’ कडे पाठविला व त्याची दखल घेऊन ‘लोकमत’ने हा विषय धसास लावला.

‘महावितरण’ने हे पैसे आठ दिवसांत देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार ही रक्कम एनएफटी करून कुंभार यांच्या खात्यावर जमा करण्यात आली.कुंभार यांचा दि. २ मे २०१४ ला कामावर असताना पिशवी येथे अपघाती मृत्यू झाला तेव्हापासून या रकमेसाठी त्या पाठपुरावा करत होत्या. त्यांना भविष्य निर्वाह निधी, पेन्शन व वैद्यकीय बिलांची रक्कम मिळाली नाही. ‘लोकमत’ने त्यासंबंधी ‘महावितरण’च्या कोल्हापूर व मुंबई कार्यालयात विचारणा केल्यावर भविष्य निर्वाह निधीचे पैसे तातडीने देण्यात आले. पेन्शनचे सुमारे दीड लाख रुपये अजून येणेबाकी आहेत.

वीज मंडळाचाच कर्मचारी, त्यातही डांबावर चढले असताना अपघाती मृत्यू होऊनही त्यांचेच जुने सहकारी मात्र या कर्मचाºयाच्या विधवा पत्नीस न्याय द्यायला तयार नव्हते. ‘देतो’, ‘करतो’ अशी आश्वासने त्या गेली चार वर्षे ऐकत होत्या. ‘आम्ही अजून नवीन आहे’, ‘प्रकरणाची माहिती घेतो,’ अशीही कारणे त्यांना दिली जात होती व वरिष्ठ अधिकाºयांना या प्रकरणात लक्ष घालायला वेळ नव्हता. त्यामुळे हे पैसे मिळत नव्हते. तब्बल आठ वेळा श्रीमती कुंभार यांना कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले. तेवढ्या वेळा ती पूर्तता केली तरी महावितरण कागदपत्रांत त्रुटी आहेत म्हणून पैसे द्यायला तयार नव्हते; परंतु हे सगळे प्रश्न ‘लोकमत’मधील एका बातमीने सोडविले व त्या असहाय्य महिलेस न्याय मिळाला. मूळचे शाहूवाडी तालुक्यातील पिशवी येथील असलेले ‘महावितरण’चे मुख्य जनसंपर्क अधिकारी पी. एस. पाटील यांनी या प्रकरणात लक्ष घालून महिलेला न्याय मिळवून दिला.‘लोकमत’मुळे न्याय मिळालामला मणक्याचा त्रास असल्याने नीट चालता येत नाही तरीही बसत-ऊठत मी चार वर्षे हेलपाटे मारले; परंतु ‘लोकमत’ला बातमी आल्यावर मला न्याय मिळाला. ती आली नसती तर मला अजून किती वर्षे त्रास सहन करावा लागला असता देव जाणे, अशी प्रतिक्रिया शालन कुंभार यांनी व्यक्त केली. आता पेन्शन व वैद्यकीय बिलांचे पैसे ‘महावितरण’ने तातडीने द्यावेत. त्यासाठी मी काय पुन्हा त्यांच्या दारात कधीच जाणार नाही, असा त्रागाही त्यांनी व्यक्त केला.