शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

निर्बंधांच्या शिथिलतेसाठी लोकप्रतिनिधींनी लसीकरण मोहिम राबवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 11:37 IST

गडहिंग्लज : लसीकरण पूर्ण झाले तरच लॉकडाऊनची बंधने शिथिल करता येतील. त्यामुळे निर्बंधांच्या शिथिलतेसाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती , ...

ठळक मुद्देनिर्बंधांच्या शिथिलतेसाठी लोकप्रतिनिधींनी लसीकरण मोहिम राबवावीहसन मुश्रीफ यांनी घेतली गडहिंग्लज येथे कोरोना आढावा बैठक

गडहिंग्लज : लसीकरण पूर्ण झाले तरच लॉकडाऊनची बंधने शिथिल करता येतील. त्यामुळे निर्बंधांच्या शिथिलतेसाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींनी मोफत लसीकरण मोहिम हाती घ्यावी, असे आवाहन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी केले.गडहिंग्लज विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.चंदगडचे आमदार राजेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.येथील पंचायत समितीच्या सभागृहात ही बैठक झाली.मुश्रीफ म्हणाले, निर्बंध शिथिल करण्यासाठी सर्वत्र किमान ७० टक्के लसीकरण पूर्ण होणे गरजेचे आहे. खाजगी संस्था, बँका, आस्थापनांनीदेखील आपल्या संस्थेतील कर्मचार्‍यांना मोफत लस उपलब्ध करुन द्यावी. त्यामुळे शासकीय यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होईल.गडहिंग्लज, आजरा आणि चंदगडमधील शासकीय रुग्णालयात बेडची संख्या वाढविण्यात आली आहे. अॉक्सिजन प्लांटची उभारणी करण्यात आली असून अन्य आरोग्य सुविधादेखील उपलब्ध करण्यात आल्या आहेत.त्यामुळे तिसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज आपण आहोत असा विश्वासही मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केला.बैठकीस गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर, भुदरगडचे प्रांताधिकारी डॉ.संपत खिलारी, तहसिलदार दिनेश पारगे, गटविकास अधिकारी शरद मगर, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ.दिलीप आंबोळे, डॉ.चंद्रकांत खोत, माजी जि.प. उपाध्यक्ष सतीश पाटील, गडहिंग्लज बाजार समितीच्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष अभय देसाई उपस्थित होते.गडहिंग्लज कारखानाही चालला पाहिजे !शेतकरी आणि कामगारांच्या पोटापाण्याचा प्रश्न कारखान्याशी निगडीत असल्यामुळे आजर्‍याच्या संचालकांनी चांगला निर्णय घेतला. त्याचप्रमाणे गडहिंग्लज कारखानादेखील चालला पाहिजे,अशीच आपली भूमिका आहे. त्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करायला तयार आहे,अशी ग्वाही मुश्रीफ यांनी पुन्हा दिली.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याpanchayat samitiपंचायत समितीHasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूर