शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

‘झेंडा’वंदनसाठी ‘खादी’वरच विश्वास, सॅटिनच्या कापडालाही परवानगी; यंदा १० ते १५ टक्के दरवाढ

By संदीप आडनाईक | Updated: January 25, 2025 17:16 IST

नांदेड, सोलापूर, मुंबई, हुबळीत होते निर्मिती

संदीप आडनाईककोल्हापूर : ‘हर घर तिरंगा’ मोहीम यशस्वी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर झेंडे लागणार असल्यामुळे केंद्र सरकारने तिरंगा ध्वज निर्मितीसाठी खादीशिवाय सॅटिनच्या कापडालाही परवानगी दिली. तथापि पारंपरिक झेंडा उत्पादन करणारा खादी उद्योग अडचणीत आला आहे. असे असले तरी अजूनही लोकांचा तिरंगा झेंड्यासाठी ‘खादी’वरचा विश्वास कायम आहे.केंद्र सरकारने राष्ट्रीय ध्वज नियमावलीत बदल करून खादीव्यतिरिक्त अन्य प्रकारच्या (सॅटिन) कापडाच्या झेंड्यांना परवानगी दिल्यामुळे ५० रुपयांपासून झेंडे उपलब्ध आहेत. पण, खादीच्या ध्वजनिर्मितीचा खर्चच ३०० रुपयांवर जातो. ऑगस्ट आणि जानेवारी याकरिता झेंड्यांची सर्वाधिक विक्री होते. ध्वजनिर्मितीचे अधिकार खादी आयोगाकडेच आहेत. कायद्यानुसार खादी किंवा रेशमापासूनच राष्ट्रध्वज तयार करण्याचे संकेत आहेत.

  • २२ जुलै १९४७ : बंगळुरू येथे खादीचे २ बाय ३ आकारातीलच राष्ट्रध्वजाची निर्मिती.
  • ध्वजनिर्मिती प्रक्रिया आणि तपशिलाच्या निश्चितीचे अधिकार भारतीय मानक कार्यालयाकडे.
  • ध्वज निर्मिती आणि वितरणाचे अधिकार खादी विकास व ग्रामोद्योग आयोगाकडेच.
  • २००२ : नवीन जिंदाल यांच्या याचिकेवरील सुनावणीनंतर सामान्यांना ध्वज वापराला परवानगी देण्यासाठी संहितेत सुधारणा.
  • २००९ : कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त संघ ध्वजनिर्मितीचा एकमेव निर्माता
  • २०२१ : ध्वजसंहितेत बदल, सामान्यांसाठी सॅटिनच्या कापडाच्या वापराला परवानगी.

राष्ट्रध्वज निर्मितीची केंद्रे

  • उदगीर (लातूर), हुबळी (कर्नाटक).
  • सोलापूर, नांदेड आणि कलवरा ग्रामोदय आश्रम, मुंबई (नवीन केंद्र)
  • वैयक्तिक वापरासाठीचा राष्ट्रध्वज फडकवला जात नाही.
  • शासकीय संस्था, शाळा, ग्रामपंचायतीसाठी एक ते आठ फुटाचे राष्ट्रध्वज
  • गडावर फडकवण्यासाठी १४ फुटाच्याच राष्ट्रध्वजाचा वापर.

खादीच्या झेंड्याला जीएसटी लागू नाही. पण, यंदा १० ते १५ टक्के दरवाढ झाली आहे. सर्व सेवा संस्था, शासकीय कार्यालये, शाळा आणि गडकिल्ल्यांवर फडकवण्यासाठी खादीचाच झेंडा वापरला जातो. कोल्हापूर खादी केंद्रातून आजअखेर ३०० वेगवेगळ्या आकाराचे राष्ट्रध्वज आणि दोरीची विक्री झाली आहे. -सुंदरराव देसाई, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा खादी व ग्रामोद्योग संघ

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRepublic Dayप्रजासत्ताक दिन २०२४