शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राकडे बोट कशाला...घरला पाठवा ठेकेदाराला; राष्ट्रीय महामार्ग लोकांचा जीव घेण्यासाठी आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 18:00 IST

मणक्यांचा खुळखुळा, तरी यंत्रणा ढिम्म

शरद यादवकोल्हापूर : राज्य रस्ते विकास महामंडळाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सहापदरीचे काम वर्ग झाल्यानंतर कामाला गती येण्याऐवजी रेंगाळलेच आहे. रोज तरणीताठी मुले धडकून जीव गमावत आहेत. याबाबत नेत्यांना विचारले की हे काम केंद्राच्या अखत्यारीत येते एवढे एकच कॅसेट लावले जाते. केंद्र काय मंगळ ग्रहावर असल्याने संपर्क होत नाही का, इथं रोज माणसं मरायला लागल्यात अन् ठेकेदार बदलता येत नाही म्हणून जर मणके मोडण्याचा खेळ सुरू असेल तर या खेळाच्या गदीत पाणी ओतण्यासाठी कोल्हापूरकर सक्षम असल्याचा सूर व्यक्त होत आहे.कागलच्या थोडे पुढे गेले की कर्नाटक सुरू होते. तेथे सहापदरीचे काम वेगवान असल्याचे पाहायला मिळते. अनेक ठिकाणी काम पूर्णही झाले असल्याचे सांगण्यात येते. मग कोल्हापूरच्या वाटणीलाच ही रखडपट्टी का, याचा जाब विचारण्याची गरज निर्माण झाली आहे. या कामावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे नियत्रंण आहे. याचे कार्यालयही उजळाईवाडी येथे आहे. ३ वर्षे झाली काम जराही पुढे सरकत नसेल व हे विचारण्यासाठी संबंधित अधिकारी फोनही घेण्याची तसदी घेत नसतील तर केंद्राने हा विभाग केवळ पगार घेण्यासाठी सुरू केला आहे का, असा सवाल केला जात आहे.

पक्षप्रवेश, राजकीय जोडण्यात नेते मग्नजिल्ह्यात बडे नेते पक्षप्रवेश करून घेण्यात, पालिका व झेडपी निवडणुकीच्या जोडण्या करण्यात मग्न आहेत.पंरतू जिल्ह्यातील जनता जीवन मरणाचा संघर्ष करत असल्याचे त्यांना काहीच कसे वाटत नाही,याचेच आर्श्चय वाटते. अजून वर्षभराने होणाऱ्या एका निवडणुकीसाठी श्रावणबाळ गणित घालत आहेत. पण इकडे वृद्धांना हायवेवरून प्रवास केला की अंथरूण धरावे लागते, त्यांची यात्रा सुखकर कोण करणार, हा प्रश्न आहेच.

गडकरींचे काम प्रामाणिक, पण खालची यंत्रणा ढिसाळकेंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी अनेक वेळा आपल्या भाषणात रस्त्यांचे जाळे देशभर विणून आपल्या मंत्रालयाने कसा विकास केला हे सांगतात. त्यांचे अमोघ वकृत्व ऐकून भारतातील रस्ते आता सिंगापूरच्या तोडीचे होणार असल्याचा भास होताे. पण प्रत्यक्षात गाडी घेवून हायवेला लागले की चिखलगुठ्ठा स्पर्धेत भाग घेतल्यासारखी अवस्था वाहनचालकाची होत असल्याचा अनुभव आहे.

विरोधकांनी हायवे ठप्प करावाजिल्ह्यातील विरोधक हायवेच्या कामावर आंदोलन करताना दिसतात. परंतु तासभर आंदोलन करून हा प्रश्न सुटणार नाही. एक पूर्ण दिवस हायवेवर ठिय्या मारला तरच याची कळ मुंबईपर्यंत लागेल. राष्ट्रीय महामार्ग दोन तास बंद पडला तर मुख्यमंत्री दखल घेतात. एखादा दिवस वाहनचालकांना त्रास झाला तरी होऊ दे, पण केंद्राला दखल घ्यावी लागेल, असा चक्काजाम केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही.

सर्किट बेंच कोल्हापुरात, टोल टोला देणे शक्यसर्किट बेंच आता कोल्हापुरात झाल्याने याचिका दाखल करण्यासाठी मुंबईला जाण्याची गरज नाही. नांगरल्यासारखा रस्ता असताना आम्ही टोल का द्यावा, यावर याचिका दाखल केली तर काम पूर्ण होईपर्यंत टोलमधून मुक्ती मिळणे सहज शक्य आहे. शहरातील टोल पंचगंगेत बुडवला, ऊस, दुधाचा दर आंदोलन करून पदरात पाडून घेतला, त्या कोल्हापूरकरांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सरळ करण्यास वेळ लागणार नाही. गरज आहे सर्वांनी रस्तावर उतरण्याची.

सहापदरी महामार्ग गेली ३ वर्षे सुरु असून ठिकठिकाणी रस्ता उकरून टाकला आहे. अद्याप २० टक्केसुद्धा काम पूर्ण झालेले नाही. ठेकेदाराला महामार्ग पूर्ण करण्यासाठी काही टाइमलाइन दिलेली आहे का नाही? जोपर्यंत महामार्ग पूर्ण होत नाही तोपर्यंत वाहनधारकांनी टोल का भरावा? जोपर्यंत कागल ते किणी नाका काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल माफ करणे गरजेचे आहे. - अनिल य. जाधव, सचिव, ग्राहक संरक्षण 

मी रोज कागल पंचतारांकित एमआयडीसीमध्ये नोकरीला जातो. या रस्त्याची अवस्था बघून पाणंदीसुद्धा कदाचित चांगल्या असतील असं आता वाटायला लागलं आहे. जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. आम्ही घरात मागे येईपर्यंत सर्वच काळजीत असतात. हे कोणत्याही लोकप्रतिनिधीला दिसत नाही का? लोकप्रतिनिधींच्या ५० लाखांपासून कोटीपर्यंतच्या गाड्या आहेत. त्यामुळे त्यांना याचा दणका बसत नाही. सर्वच लोकप्रतिनिधींना एकदा दुचाकीने कागल ते पेठ नाका प्रवास करायला लावले पाहिजे, तरच खरे दुखणे कळेल. - ऋषिकेश कमलाकर, भादोले

English
हिंदी सारांश
Web Title : Fix highway, not blame game; Kolhapur residents demand action now.

Web Summary : Kolhapur residents are frustrated with the delayed six-lane highway construction, leading to accidents. They question the authorities' inaction and demand accountability from the contractor, urging protests and toll waivers until completion.