शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रकच्या धडकेत पादचारी ठार, आयसोलेशन रिंग रोडवर दुर्घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 19:08 IST

पायी रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पादचाऱ्यास भरधाव ट्रकने ठोकरल्याने तो जागीच ठार झाला. ही दुर्घटना गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आयसोलेशन रिंग रोडवर छत्रपती चौकात घडली. भीमराव धोंडीराम सातारकर (वय ५८, रा. शाहूनगर) असे या ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते बुधवारी (दि. १०) आपल्या सुभाषनगर येथील मनीषानगरमधील मुलीकडे राहण्यासाठी आले होते. दुर्घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

ठळक मुद्दे भरधाव ट्रकच्या धडकेत पादचारी ठार, आयसोलेशन रिंग रोडवर दुर्घटनादोनच दिवसांपूर्वी मुलीकडे राहायला आले होते

कोल्हापूर : पायी रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पादचाऱ्यास भरधाव ट्रकने ठोकरल्याने तो जागीच ठार झाला. ही दुर्घटना गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आयसोलेशन रिंग रोडवर छत्रपती चौकात घडली. भीमराव धोंडीराम सातारकर (वय ५८, रा. शाहूनगर) असे या ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते बुधवारी (दि. १०) आपल्या सुभाषनगर येथील मनीषानगरमधील मुलीकडे राहण्यासाठी आले होते. दुर्घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.याबाबत माहिती अशी की, भीमराव सातारकर हे रिंग रोडवरील बसथांब्यावर बसले होते. एसएससी बोर्डाकडून राधानगरीकडे भरधाव जाणारा ट्रक छत्रपती चौकातील गतिरोधकाजवळ आला. याच वेळी सातारकर हे रस्ता ओलांडत होते. त्यावेळी त्यांना ट्रकने ठोकर दिल्यामुळे ते जागीच ठार झाले.

परिसरातील नागरिकांनी, महिलांनी दुर्घटनास्थळी मोठी गर्दी केली. तेव्हा मनीषानगरमधील मुलीकडे ते बुधवारी राहण्यासाठी आल्याची माहिती पुढे आली. राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून विच्छेदनासाठी मृतदेह सीपीआर रुग्णालयामध्ये नेण्यात आला आहे. मृत भीमराव सातारकर यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, जावई असा परिवार आहे.मुलीचा आक्रोशदुर्घटनास्थळी गर्दी झाली होती. त्यावेळी मनीषानगरमधील एका महिलेने रस्त्यावर पडलेला मृतदेह पाहून आक्रोश केला. त्यावेळी ते तिचेच वडील असल्याचे स्पष्ट झाले. तिथे मुलीने केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. 

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर