शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

मोटरसायकल ट्रॅक्टर धडकेत पादचारी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 10:45 IST

Accident ichalkaranji kolhapur- शहापूर (ता.हातकणंगले) येथील मलाबादेनगर येथे पादचाऱ्यास मोटारसायकलस्वाराने धडक दिली. त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. सुशांत दिनकर टिंबुगडे (वय २७, रा. मलाबादेनगर, शहापूर) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी मोटरसायकलस्वरास शहापूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. हा अपघात रविवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडला.

ठळक मुद्देमोटरसायकल ट्रॅक्टर धडकेत पादचारी ठारमोटरसायकलस्वरास शहापूर पोलिसांनी घेतले ताब्यात

इचलकरंजी : शहापूर (ता.हातकणंगले) येथील मलाबादेनगर येथे पादचाऱ्यास मोटारसायकलस्वाराने धडक दिली. त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. सुशांत दिनकर टिंबुगडे (वय २७, रा. मलाबादेनगर, शहापूर) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी मोटरसायकलस्वरास शहापूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. हा अपघात रविवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडला.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पंचगंगा फॅक्टरी रोड ते मलाबादेनगर या मार्गावर सुशांत हा दुधाची किटली घेवून गो-शाळेतील दूध आणण्यास निघाला होता. त्यावेळी समोरून आलेल्या मोटारसायकल ( एम एच ०९ सी एन ६३१३ ) ने त्याला धडक दिली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी तेथून ऊस भरून निघालेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीसही त्याचा धक्का लागल्याची चर्चा सुरू होती.

घटनास्थळी वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनास्थळा वरून सुशांत यास आय.जी.एम रुग्णालयात नेण्यात आले मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. रुग्णालयात स्थानिक नगरसेवक किसन शिंदे, मित्र परिवार व नातेवाइकांनी गर्दी केली होती. सुशांत यांचा विवाह झाला असून, त्यांना सात महिन्यांचा मुलगा आहे.दरम्यान, रात्री उशिरा मोटारसायकल व चालक तसेच उसाने भरलेला ट्रॅक्टर (एम एच २१ किव्ह १६७४) , ट्रॉली (एम एच २३ किव्ह ३८१८) व ट्रॉली (एम एच २३ किव्ह ३८१९) सह चालकासही ताब्यात घेतले आहे. 

टॅग्स :Accidentअपघातichalkaranji-acइचलकरंजीkolhapurकोल्हापूर