शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

पवारसाहेब, राष्ट्रवादी-भाजपच्या ‘सेटिंग’मध्ये तुम्हीच लक्ष घाला : पतंगराव कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 20:51 IST

सांगली : ‘आता परिस्थिती गंभीर आहे, लोक बदलाची भाषा बोलायला लागलेत, राज्यात, देशात आपण एकत्र आले पाहिजे, असा सूर आहे.

ठळक मुद्देआघाडीचे नेतृत्व करण्याचे आवाहन‘खरं तर आता परिस्थिती गंभीर आहे, लोक बदलाची भाषा बोलायला लागलेत, मी मुख्यमंत्री फडणवीसांना म्हणालो, ‘तुमचं काय दुखणं आहे?

सांगली : ‘आता परिस्थिती गंभीर आहे, लोक बदलाची भाषा बोलायला लागलेत, राज्यात, देशात आपण एकत्र आले पाहिजे, असा सूर आहे. सांगलीत मात्र राष्ट्रवादी आणि भाजपचीच सेटिंग आहे. पवारसाहेब, यात तुम्ही स्वत: लक्ष घाला’, अशी टोलेबाजी काँग्रेसचे नेते आ. पतंगराव कदम यांनी शुक्रवारी दस्तुरखुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर केली.

कवठेएकंद (ता. तासगाव) येथे सिद्धराज शेती पाणीपुरवठा संस्थेच्या रौप्यमहोत्सव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर पवार यांच्यासह भाजपचे खासदार संजय पाटील, राष्टÑवादीचे नेते आमदार जयंत पाटील, आ. सुमनताई पाटील, शेकापचे आमदार जयंत पाटील व धैर्यशील पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम, कुंडलच्या क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड उपस्थित होते. स्वत:च्या पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघातील भाजप आणि राष्ट्रवादीच्या ‘मिलीभगत’वर बोट ठेवत पतंगरावांनी राष्ट्रवादीचे नेते अरुण लाड यांना कोपरखळ्या हाणल्या.

पतंगरावांनी एकीकडे भाजपवर हल्ला चढवत दुसरीकडे राष्ट्रवादीला टोले दिले. क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी नुकतेच कृषी प्रदर्शन आणि स्वत:च्या वाढदिवस सोहळ्याच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन केले. शरद पवार यांच्याहस्ते गुरुवारी त्यांचा गौरव झाला. जिल्'ातील सर्वपक्षीय नेत्यांना त्यांनी निमंत्रण दिले होते. मात्र पतंगरावांना दिले नव्हते. ही खंत व्यक्त करत पतंगराव म्हणाले की, आरं, घरचं सोडून पळत्याच्या मागे का लागताय? जिल्'ाच्या राजकारणातल्या वावटळात ३३ वर्षे काम केलंय. आमच्यात भाजप आणि राष्टÑवादी एकत्र येत असतात.

सगळे मिळून माझ्याविरोधात बैठका घेतात. भविष्यात मात्र घोटाळा करून चालणार नाही. लोकांची अपेक्षा आहे, पवारांनी नेतृत्व करावं. आपण सारे एक विचाराचे, एका दिशेचे आहोत. या कार्यक्रमाला मला बोलवलं, मी आलो. मी कुठं आड येत नाही आणि बोलावल्याशिवाय कुठं जात नाही. मला अरुणने बोलावलं नाही. पंख लहान होते, त्यावेळेला मला जी. डी. बापू लाड यांनीच मदत केली. १९८५ ला बापूंनी पाठिंबा दिल्यामुळेच मी आमदार झालो. कुंडलमध्ये माझं शिक्षण झालं. बालपण गेलं. तिथली माणसं माझ्या हक्काची आहेत. मी लोकांच्या जीवावर आहे, आता पंख मोठे झालेत. माझं पंख छाटायचा प्रयत्न करू नका, तुम्हाला जमणार नाही.ते म्हणाले की, राज्यातील भाजप सरकारला पश्चिम महाराष्ट्राचे वावडे आहे. मी मुख्यमंत्री फडणवीसांना म्हणालो, ‘तुमचं काय दुखणं आहे? आमची फाईल आली की फुली का मारता?’‘खरं तर आता परिस्थिती गंभीर आहे, लोक बदलाची भाषा बोलायला लागलेत, राज्यात, देशात एकत्र आले पाहिजे, असा सूर आहे. आमच्या जिल्'ात मात्र राष्ट्रवादी आणि भाजपचीच सेटिंग आहे. पवारसाहेब, यात तुम्ही स्वत: लक्ष घाला,’ असा टोला त्यांनी मारला. त्यावर खासदार संजयकाकांचा त्रास आहे का? असे विचारल्यावर, ‘'ो नुसता घुलवतो. माणसं गोळा करून जाहिरातबाजी करतो. त्याचा मला त्रास नाही. त्याचं माझ्याबाबतीत काही वाकडं नसतं. आम्ही यापूर्वी एकत्र काम केलंय,’ असे त्यांनी सांगितले.पतंगरावांनी शेकापचे आमदार जयंत पाटील ‘सर्वांत श्रीमंत शेकापवाला’ असल्याचे सांगून त्यांनाही चिमटा काढला.

 

टॅग्स :PoliticsराजकारणIndiaभारत