शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पर्युषण पर्व: जैन समाजात आहे माफी मागण्याचा सण

By संदीप आडनाईक | Updated: September 15, 2023 12:46 IST

पाणी न पिता कडक उपवास, एकासन

संदीप आडनाईककोल्हापूर : एखादी चुकीची घटना आपल्या हातून घडल्यास त्याबद्दल माफी मागण्यासाठीही मोठे मन असावे लागते, असे म्हटले जाते. परंतु वर्षभरात केलेल्या चुकांची, पापांची जाणीव ठेवून त्याची माफी मागण्यासाठीही एका समाजात एक खास सण साजरा केला जातो, तो समाज म्हणजे जैन समाज आणि तो सण म्हणजे संवत्सरी किंवा पर्युषण पर्व. लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाबरोबरच जैन धर्मीयांचा हा सर्वात मोठा उत्सव मानला जातो. हा त्यांचा माफी मागण्याचा दिवस आहे. याला पर्व धीरज, असेही म्हणतात. “मिच्छा मी दुक्कडं” ही प्रथा या पर्युषण पर्वाची मुख्य प्रक्रिया असते.हिंदू धर्मातील नवरात्रीप्रमाणे जैन समाज पर्युषण पर्व साजरा करतो. भगवान महावीर यांच्यासह इतर सर्व जैन तीर्थंकरांनी सत्य, अहिंसा आणि क्षमा यांचे विशेष महत्त्व सांगितले आहे. जैन समाज या तत्त्वावर चालतो. हा समाज आठ दिवस हा संवत्सरी पर्व किंवा पर्युषण पर्व सण म्हणून साजरा करतात. जैन धर्मात श्वेतांबर आणि दिगंबर हे दोन मुख्य पंथ आहेत. या दोन्ही पंथात हा संवत्सरी पर्व मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. श्वेतांबर पंथातील बांधव हे पर्युषण पर्व आठ दिवस तर दिगंबर पंथातील बांधव १६ दिवसांपर्यंत या पवित्र व्रताचं पालन करतात.आषाढ शुक्ल चतुर्दशीला जैन धर्मातील चातुर्मास सुरू होतो. या चार महिन्यांत जैन बांधव तप-साधना करतात. या कालावधी दरम्यानच भाद्रपद महिन्यात संवत्सरी पर्व साजरे केले जाते. कळत-नकळत वर्षभर मानवांकडून असंख्य चुका झालेल्या असतात, अनेकांना दुखावलेले असते, अनेक जिवांची हत्या झालेली असते. या सर्व चुकांची पर्युषण पर्वाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे संवत्सरीच्या शेवटच्या दिवशी क्षमा मागितली जाते.पाणी न पिता कडक उपवास, एकासनपर्युषण पर्वाच्या काळात जैन बांधव, सर्व कंद-मूळ, पालेभाजी यासह अनेक गोष्टींचा त्याग करतात. एकासन म्हणजेच सायंकाळ होण्याअगोदर एकवेळचे भोजन घेतात. याबरोबरच अनेक जैन बांधव पाणी देखील न घेता कडक उपवास करतात. जैन मंदिरामध्ये जैन मुनींचे प्रवचन, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर