शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
5
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
6
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
7
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
8
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
9
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
10
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
11
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
12
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
13
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
14
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
15
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
16
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
17
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
18
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
19
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
20
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

शाहूवाडीत पक्षीय राजकारणाला तिलांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2016 23:59 IST

चारही गटांकडून सोयीचा घरोबा : शिवसेनेची राष्ट्रवादीबरोबर, तर कॉँग्रेसची जनसुराज्य शक्ती पक्षाबरोबर युती होणार

राजाराम कांबळे --मलकापूर --पक्षीय राजकारणाला तिलांजली देऊन गटा-तटाच्या राजकारणासाठी प्रसिद्ध असणाऱ्या शाहूवाडी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. तालुक्यात शिवसेनेचे आमदार सत्यजित पाटील व राष्ट्रवादीचे मानसिंगराव गायकवाड यांची युती आहे. तर ‘जनसुराज्य’चे माजी आमदार विनय कोरे व कॉँग्रेसचे करणसिंह गायकवाड यांची युती होणार, असल्याचे संकेत मिळत आहेत. गत निवडणुकीत सत्यजित पाटील व करणसिंह गायकवाड यांनी शाहूवाडी विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवून जिल्हा परिषदच्या चार जागा व पंचायत समितीच्या सात जागा जिंकल्या होत्या. तर जनसुराज्य व राष्ट्रवादी या पक्षांनी एकत्र निवडणूक लढवून पंचायत समितीच्या एका जागेवर समाधान मानावे लागले होते. शिवसेना व कॉँग्रेस पक्षाची युती निवडणुकीनंतर वर्षभर राहून तुटली. सध्या तालुक्यात नव्या समीकरणाची नांदी सुरू आहे. तालुक्यात चार जिल्हा परिषदेचे मतदार संघ आहेत. सरुड जिल्हा परिषद मतदारसंघावर सत्यजित पाटील यांचे वर्चस्व आहे, तर पिशवी मतदारसंघावर दोन्ही गायकवाड यांचे वर्चस्व आहे. शित्तूर वारुण व पणुंद्रे जिल्हा परिषद मतदारसंघावर कॉँग्रेस, शिवसेना व जिल्हा बॅँकेचे संचालक सर्जेराव पाटील-पेरीडकर यांचे वर्चस्व आहे. या दोन्ही मतदारसंघात कॉँग्रेस पक्षाला मानणारा वर्ग आहे.२०१२ च्या निवडणुकीत माजी आमदार विनय कोरे विधानसभेचे नेतृत्व करीत होते. आमदार सत्यजित पाटील व कॉँग्रेसेचे करणसिंह गायकवाड यांनी युती करून शाहूवाडी विकास आघाडी स्थापन केली. या आघाडीतून पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या सर्व जागा निवडून आल्या, तर विनय कोरे व मानसिंगराव गायकवाड यांच्या युतीला एक पंचायत समितीची जागा मिळाली. शित्तूर-वारुण जिल्हा परिषद मतदारसंघांची जागा अवघ्या १५० मतांनी गमावल्याने ‘जनसुराज्य’ला येथे मोठा धक्का बसला. पणुंद्रे जिल्हा परिषद मतदारसंघात सर्जेराव पाटील यांच्या विरोधात सरुडकर गट व करणसिंह गायकवाड गट या दोन्ही गटांनी रात्रंदिवस प्रचारयंत्रणा राबविल्यामुळे पेरीडकरांचा पराभव झाला. विनय कोरे व मानसिंगराव गायकवाड यांच्या युतीच्या जागा कमी मतांच्या फरकाने गमविल्या. विधानसभेच्या निवडणुकीत सेनेचे आमदार सत्यजित पाटील यांनी विनय कोरेंचा अवघ्या थोड्या मतांनी पराभव केला. येथूनच सरुडकर गटाला उभारी मिळाली. मलकापूर नगरपालिकेच्या सत्तेत सध्या जनसुराज्य व राष्ट्रवादी दोन्ही सत्तेत आहेत. मात्र, दोघांच्यात विस्तवही जात नाही. जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीत एक हाती सत्ता असणारे मानसिंगराव गायकवाड यांचा सर्जेराव पाटील-पेरीडकर यांनी धक्कादायकरीत्या पराभव केला. त्यामुळे येथूनच तालुक्याच्या राजकारणाची गणिते विस्कटली. ग्रामपंचातयतीच्या झालेल्या निवडणुकीनंतर तालुक्यातील सर्वच गटांनी आपले दावे-प्रतिदावे केले आहेत. विकासापेक्षा गटाच्या राजकारणाला येथे ऊत आला आहे. जनता मात्र गटातटाच्या राजकारणात अडकली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत महादेवराव महाडिक यांना आमदार सत्यजित पाटील, मानसिंगराव गायकवाड या दोघांनी मदत केली, तर आमदार सतेज पाटील यांना करणसिंह गायकवाड, सर्जेराव पाटील यांनी मदत केली. आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप, जनसुराज्य, राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस व शेतकरी संघटना यांनी गावागावांत चाचपणी सुरू केली आहे. निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी कॉँग्रेस यांची युती होणार आहे. कारण मानसिंगराव गायकवाड यांचे पुत्र रणवीर गायकवाड यांना जिल्हा परिषदेत निवडून जायचे आहे. विधानसभेला आमदार सत्यजित पाटील यांना मानसिंगराव गायकवाड यांनी मदत केली होती. आमदार सत्यजित पाटील यांना पैरा फेडायचा आहे. अशी युती झाल्यास ‘जनसुराज्य’चे विनय कोरे, ‘कॉँग्रेस’चे करणसिंह गायकवाड यांची आघाडी होणार आहे. तालुक्यात खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मोठी ताकद आहे. भाजपने गावागावांत आपली ताकद निर्माण केली आहे. या दोन्ही पक्षांनी आपले फासे गुलदस्त्यात ठेवले आहेत. पणुंद्रे, पिशवी, शित्तूर वारुण या जिल्हा परिषद मतदारसंघात काट्याची टक्कर होणार आहे. सत्ताधारी विकासकामांच्या जोरावर मते मागणार आहेत, तर विरोधक कागदावर केलेल्या कामाचे मोजमाप काढून डाव-प्रतिडाव टाकले जाणार आहेत. या तीन मतदारसंघांत शेतकरी संघटना, भाजप व दलितांच्या मतांचे मोठे राजकारण होणार आहे. आगामी मलकापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेची रंगीत तालीम होणार आहे. या निवडणुकीत आमदार सत्यजित पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक रंग भरणार आहेत.नवीन मातबरांचा उमेदवारांचा अभावआगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नवीन मातबर उमेदवारांचा अभाव आहे. कारण निवडणूक लढविण्यासाठी लागणारी आर्थिक गणिते यांचा सारासार विचार होणार आहे. सदस्यांची फिल्डिंगजिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून सदस्यांनी तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्न केले आहेत. आगामी निवडणुकीसाठी काही विद्यमान सदस्यांनी पुन्हा फिल्डिंग लावली आहे. यासाठी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नामदार चंद्रकांत पाटील यांनी शाहूवाडी तालुक्यात विकासाची कामे केली आहेत. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. पंचायत समिती सदस्य पंडितराव नलवडे (सावे), नामदेवराव पाटील (सावे), पांडुरंग पाटील (पेंडागळे), विष्णू पाटील (सोनवडे), वंदना पाटील (पेरीड), लतादेवी पाटील (रेठरे), प्रभावती पोतदार (शित्तूर वारुण), संगीता पाटील (आंबार्डे)जिल्हा परिषद सदस्यआकांक्षा अमर पाटील (शित्तूर वारुण), लक्ष्मीदेवी हंबीरराव पाटील (सरूड), भाग्यश्रीदेवी गायकवाड (पिशवी), योगीराज गायकवाड (पणुंद्रे)