खोची : स्पर्धेत सहभागी झाल्याने गावात विकासाची सर्वोत्तम कामे करण्याची प्रेरणा मिळते. लोकविकासाची चळवळ गतिमान करण्याची भावना, उर्मी निर्माण होण्यासाठी स्पर्धा हा उपक्रम चांगला आहे. गावकऱ्यांनी एकजुटीने यात आपले योगदान द्यावे. नरंदे गावात समाधानकारक कामे झाली आहेत, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.
‘आर. आर. पाटील (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार’ स्पर्धेसाठी हातकणंगले तालुक्यातील नरंदे गावाची तपासणी करण्यासाठी संजयसिंह चव्हाण यांनी गावाला भेट दिली. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय राजमाने, जलजीवन मिशनच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, विस्तार अधिकारी संतोष पोवार उपस्थित होते.
सरपंच रवींद्र अनुसे यांनी केंद्र, राज्य सरकारच्या योजनांची केलेली अंमलबजावणी, आरोग्य, शिक्षण तसेच विविध उपक्रमांची माहिती दिली. ग्रामविकास अधिकारी राजेंद्र भोपळे यांनी कामांची माहिती दिली. कार्यक्रमाला शरद कारखान्याचे संचालक बबन भंडारी, सर्जेराव भंडारी, प्रतापराव देशमुख, उपसरपंच मंगल एडवान, अभिजीत भंडारी, संतोष भंडारी, वैभव भंडारी, राजू खरोशे, महावीर चौगुले उपस्थित होते.
फोटो ओळी - नरंदे येथील ग्रामपंचायत कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बबन भंडारी, संजय राजमाने, चंद्रकांत सूर्यवंशी, सर्जेराव भंडारी, रवींद्र अनुसे उपस्थित होते.
(छाया-आयुब मुल्ला)