शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

Mumbai Hostage Case: पालकांनी सांगितली 'त्या' आजीच्या धैर्याची कहाणी, मुलांना सुरक्षित ठेवले; कोल्हापुरातील साक्षीदाराचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 17:13 IST

जखमी आजींना मिळाला डिस्चार्ज

कोल्हापूर : त्या दिवशी मात्र मुले जेवणासाठी बाहेरच आली नाहीत. त्यानंतर त्याने १७ मुलांना ओलीस ठेवून त्यांच्या पालकांना व्हिडीओ पाठवला. त्यात काही मुलांसमोर एक केमिकल टाकून लायटर हातात असल्याचे रोहितचे दृश्य होते. यामुळे पालकांमध्ये काही वेळ चलबिचल झाली, मात्र हा शूटिंगचाच भाग असल्याने हा थरार लवकर लक्षात आला नाही, मात्र माझ्या आईने धैर्य दाखवत मुलांना सुरक्षित ठेवले, अशी माहिती ओलिस ठेवलेल्या कोल्हापुरातील दहा वर्षांच्या मुलीच्या आईने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले. या घटनेत जखमी झालेल्या आजींना शनिवारी डिस्चार्ज मिळाला आहे.पवईतील साकीविहार मार्गावर महावीर क्लासिक या इमारतीत 'बटरफ्लाय' नर्सिंग शाळेच्या आवारात असलेल्या 'आरए' स्टुडिओ भाड्याने घेऊन रोहित आर्या याने गेल्या आठवड्यात तेथे एका ‘ओटीटी’साठी ऑडिशन घेतले. २६ ते २९ या तारखेपर्यंत सकाळी १० वाजता मुले ऑडिशनसाठी जायची. दुपारी मुलांना जेवण्यासाठी सुटी दिली जायची. या चार दिवसांत शूटिंगच्या वेळी कोणालाही रोहितचे वागणे संशयास्पद वाटले नाही.तो रोजच मुलांना भेटत होता, चॉकलेट देत होता. मुलांशी त्याचे फ्रेंडली नाते तयार झाले होते. लायटरने स्टुडिओ जाळणार असल्याचे सांगणारा पहिला व्हिडीओ समोर आला तेव्हा आम्ही रडू लागलो. याचा इतका जबरदस्त धक्का बसला की, नेमके काय झाले, हे सांगतानाही हातपाय थरथरतात असा अनुभव ओलिस ठेवलेल्या मुलीच्या पालकांनी सांगितला.

आईने दाखवले धैर्यमाझ्या मुलीसोबत माझी ७५ वर्षांची आईही या शूटिंगदरम्यान रोज जात होती. वृद्ध असल्यास दृश्य वास्तववादी होईल असे सांगून त्या दिवशी माझ्या आईलाही त्याने स्टुडिओच्या आत बोलावले. गरम वातावरण असल्याने रिसेप्शनजवळील सीसीटीव्हीबाहेर एसीमध्ये तिला खुर्चीत बसवले. रोहितचा तो व्हिडीओ पालकांमध्ये पसरल्यानंतर आम्ही खाली रडू लागलो, ती गडबड ऐकून आईने फोन केला, तेव्हा तिला खरी परिस्थिती समजली. तिने तत्काळ धैर्य दाखवून जवळ असलेल्या एका खोलीत मुलांना सुखरूप ठेवले.

वृद्ध आईला दिला डिस्चार्जजेव्हा पोलिसांनी त्याला मारले, त्यानंतर ती त्याच फोडलेल्या खिडकीतून बाहेर पडली. सर्व मुलांना आधी बाहेर काढले. त्यादरम्यान फुटलेली काच असलेली खिडकी कोसळली, त्यात आई जखमी झाली. तिच्यावर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार झाले. शनिवारी तिला डिस्चार्ज मिळाल्याचे या पालकाने सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Hostage: Grandma's courage saved kids; witness recounts ordeal.

Web Summary : During a mock audition gone wrong, a brave grandmother shielded children from a hostage situation. Despite injury from broken glass, she ensured their safety, showcasing immense courage.