शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

पानसरे हत्याप्रकरणी  न्यायालयाने अंदुरे, कुरणे यांचा जामीन अर्ज फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 18:16 IST

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे हत्याप्रकरणी अटक केलेल्या संशयित आरोपी सचिन अंदुरे व भरत कुरणे या दोघांनी ...

ठळक मुद्देपानसरे हत्याप्रकरणी  न्यायालयाने अंदुरे, कुरणे यांचा जामीन अर्ज फेटाळलादोन्ही बाजूंचे वकिलांचे म्हणणे ऐकल्यानंतर सुनावणी पूर्ण

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे हत्याप्रकरणी अटक केलेल्या संशयित आरोपी सचिन अंदुरे व भरत कुरणे या दोघांनी दाखल केलेल्या जामीन अर्ज सुनावणीअंती न्यायालयाने सोमवारी (दि.२४) फेटाळला. या अर्जाची जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. डी. शेळके यांच्यासमोर सुनावणी झाली.कॉ. पानसरे हत्याप्रकरणी तपास यंत्रणेने आतापर्यत सचिन अंदुरे, भरत कुरणेसह २१ जणांविरोधी गुन्हे दाखल करून, १९ जणांना अटक केली आहे. आकोळकर व पवार हे दोघे अद्याप पसार आहे. त्याचा तपास यंत्रणेकडून कसून शोध घेतला जात आहे. याचदरम्यान अटक केलेल्या अंदुरे आणि कुरणे या दोघांनी जामिनावर सुटका करावी, याकरिता कसबा बावडा येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला.

या अर्जावर सरकारी पक्षाकडून व या दोघा संशयितांच्या वकिलांच्याकडून युक्तिवाद करण्यात आला. या युक्तिवादावेळी संशयित आरोपी अंदुरे व कुरणे यांचा अप्रत्यक्ष पानसरे हत्येमध्ये सहभाग आहे. त्यामुळे या दोघांचा जामीन अर्ज फेटाळून लावावा, अशी मागणी विशेष सरकारी वकील यांनी केला होती तर अंदुरे आणि कुरणे यांचा पानसरे हत्याप्रकरणी कुठेही संबंध दिसत नसल्यामुळे त्यांना जामीन मंजूर व्हावा, अशी मागणी त्यांच्या वकिलांनी केली होती.

शुक्रवारी दोन्ही बाजूंचे वकिलांचे म्हणणे ऐकल्यानंतर सुनावणी पूर्ण झाली. त्यानंतर न्यायालयाने सोमवारी अंदुरे आणि कुरणे यांचा जामीन अर्ज फेटाळला.

टॅग्स :Govind Pansareगोविंद पानसरेkolhapurकोल्हापूरCourtन्यायालय