शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्याचे फोनावर फोन
2
जर एखाद्या देशाने 'न्यूक्लियर' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
3
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
4
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
5
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
6
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
7
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
8
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
9
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
10
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
11
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
12
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
13
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
14
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
15
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
16
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
17
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
18
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
19
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
20
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?

कोल्हापुरात पानसरे दाम्पत्यावर गोळीबार

By admin | Updated: February 17, 2015 01:23 IST

महाराष्ट्र सुन्न : दोघेही गंभीर जखमी; हल्लेखोर पसार

 

 

 

 

 

 

 

 

कोल्हापूर : पुरोगामी चळवळीतील अग्रणी नेते, श्रमिक कष्टकरी व कामगारांचे पुढारी तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय नेते अ‍ॅड. गोविंद पंढरीनाथ पानसरे (वय ८१) यांच्यावर सोमवारी सकाळी मोटारसायकलवरून आलेल्या दोघा अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून खुनी हल्ला केला. या हल्ल्यात पानसरे यांच्या पत्नीही जखमी झाल्या असून, दोघांचीही प्रकृती गंभीर आहे. ही घटना पानसरे यांच्या निवासस्थानापासून सत्तर फुटांवर घडली. नरेंद्र दाभोलकर यांच्यावरील हत्येशी साधर्म्य दर्शविणाऱ्या या हल्ल्यामुळे महाराष्ट्र सुन्न झाला आहे.पानसरे यांच्यावर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा निषेध करत या घटनेमागे कोणत्या प्रतिगामीशक्ती आहेत, याचा तपास करण्यासाठी पोलिसांची दहा पथके तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना दिली.गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी उमा (वय ६७) सकाळी नित्यनियमाप्रमाणे फिरायला बाहेर पडले. सकाळी ९.२० वाजण्याच्या सुमारास ते घराकडे परतत असतानाच दोघा हल्लेखोरांनी त्यांच्यावर पिस्तूलमधून पाच गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक गोळी पानसरे यांच्या मानेला, दुसरी काखेत, तर तिसरी त्यांच्या उजव्या पायाला लागली. यावेळी झालेल्या झटापटीत त्यांच्या पत्नी उमा यांच्याही डोक्याला गोळी घासून गेल्याने गंभीर दुखापत झाली. हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पानसरे पती-पत्नी रस्त्यावरच कोसळले. तोपर्यंत घरातून पानसरे यांच्या स्नुषा मेघा, नातू मल्हार व कबीर, तसेच त्यांचे नातेवाईक मुकुंद कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या पानसरे दाम्पत्यांना नजीकच्या अ‍ॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पानसरे यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे त्यांना तत्काळ रक्त चढविण्यात आले. त्यांच्या हृदयाचे स्पंदन, नाडीचे ठोके नॉर्मल करण्यात यश मिळविले. त्यानंतर पानसरे पती-पत्नींवर एकाचवेळी शस्त्रक्रिया करण्यात आली. (प्रतिनिधी)घटनाक्रमसकाळी साडेसात वाजता पानसरे दाम्पत्य फिरण्यासाठी बाहेरनऊ वाजून २० मिनिटांनी सागरमाळकडून घराकडे येत होते सकाळी नऊ वाजून २७ मिनिटांनी अज्ञातांचा गोळीबार दहा वाजण्याच्या सुमारास खासगी रुग्णालयात पानसरे, त्यांच्या पत्नी उमा यांना दाखलसकाळी सव्वादहा वाजता शस्त्रक्रियेस सुरुवात साडेदहाच्या सुमारास पोलीस घटनास्थळी दाखलपावणेअकरा वाजल्यापासून ओसवाल यांच्या कुटुंबीयांकडून माहिती घेण्यास पोलिसांची सुरुवात अकरा वाजता विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांची घटनास्थळाची पाहणीओसवाल यांच्या कुटुंबातील व्यक्तींचा पोलिसांना जबाबदुपारी साडेबारा वाजता पुन्हा डॉ. मनोजकुमार शर्मा यांची पाहणीदुपारी साडेतीन वाजता पहिली शस्त्रक्रिया पूर्णचार वाजता संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालय परिसरात घोषणाबाजीपाच वाजता गृहराज्यमंत्री राम शिंदे यांची पोलीस ताफ्यातील गाडी अडविली, चप्पल फेकलेचळवळीतील नेत्यांवरील हल्ल्यांचा इतिहासअंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर पुण्यात गोळ्या घालून खून करण्यात आला.२० आॅगस्ट २०१३अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर पुण्यात गोळ्या घालून खून करण्यात आला.१३ जानेवारी २०१०माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्यावर वार करून त्यांचा खून करण्यात आला.१६ जानेवारी १९९७१६ जानेवारी १९९७कामगार चळवळीतील नेते कॉम्रेड दत्ता सामंत यांच्यावर बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडून त्यांची जीवनयात्रा संपविली.५ जून १९७०कम्युनिस्ट पक्षाचे आमदार आणि कामगार चळवळीतील नेते कृष्णा देसाई यांची मुंबईत हत्या.आज ‘कोल्हापूर बंद’ नाही; केवळ मोर्चा कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध व हल्लेखोरांना तत्काळ ताब्यात घ्या, या मागणीकरिता ‘आम्ही भारतीय लोक आंदोलन’ व कोल्हापुरातील सर्व डाव्या पक्षांतर्फे आज, मंगळवारी कोल्हापूर बंदची हाक देण्यात आलेली नाही. केवळ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले आहे, असे कम्युनिस्ट पक्षातर्फे गिरीष फोंडे यांनी सोमवारी रात्री स्पष्ट केले. कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.अण्णा म्हणाले, घात झालापरिसरातील नागरिक शशिकांत जोग यांनी सांगितले की, ‘मला फटाके वाजल्यासारखा आवाज आला. मी बाहेर आलो तर एक महिला पालथी आणि एक माणूस खाली बसला होता. मी जवळ गेलो आणि पाहतो तर पानसरे अण्णा होते. त्यांच्या नाका-तोंडातून रक्त येत होते. ते एवढेच म्हणाले, ‘घात झाला, घात झाला’.पानसरेंचा उपचारास प्रतिसादज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या जीवास अतिरक्तस्रावाने धोका निर्माण झाला होता. शस्त्रक्रिया करून हा रक्तस्राव थांबविण्यात यश आले आहे. मानेतील व छातीची मोठी शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. उपचारास ते चांगला प्रतिसाद देत असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अ‍ॅस्टर आधार रुग्णालयाचे डॉक्टर उल्हास दामले यांनी रात्री सात वाजता दिली. पानसरे यांच्या मानेला लागलेल्या गोळीमुळे झालेला अतिरक्तस्राव थांबविणे व छातीतील बरगडीमध्ये घुसलेली गोळी आम्ही बाहेर काढली आहे. सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांच्या नाडीचे ठोके व रक्तदाबही नियमित आहे.पानसरे यांना तीन गोळ््या लागल्या आहेत. मानेला व पायाला दोन गोळ््या लागून गेल्या होत्या, तर एक गोळी त्यांच्या छातीच्या फासळ््याला लागली होती. ती आम्ही शस्त्रक्रिया करून बाहेर काढली. त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्या डोक्यालाही गोळी चाटून गेल्याने त्यांच्यावरही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.गोविंद पानसरे यांच्यावर तीन यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांना सायंकाळी अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. रात्री साडेआठच्या सुमारास ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील यांनी रुग्णालयात पानसरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.