शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
4
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
5
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
6
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
7
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
8
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
9
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
10
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
11
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
12
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
13
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
14
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
15
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
16
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
17
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
18
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
19
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
20
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन

पन्हाळकर, मासाळ यांना राष्ट्रपती पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 00:28 IST

कोल्हापूर : स्वातंत्र्यदिनानिमित्त देण्यात येणाऱ्या राष्ट्रपती पोलीस पदकाचे मानकरी यंदा पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षातील सहायक फौजदार दत्तात्रय बाबूराव मासाळ व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे हवालदार वसंत शंकर पन्हाळकर हे ठरले. पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाºया कर्मचाºयांना स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर केले जाते.तसेच मूळचे कसबा बावड्यातील गणपत पिंगळे यांना ...

कोल्हापूर : स्वातंत्र्यदिनानिमित्त देण्यात येणाऱ्या राष्ट्रपती पोलीस पदकाचे मानकरी यंदा पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षातील सहायक फौजदार दत्तात्रय बाबूराव मासाळ व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे हवालदार वसंत शंकर पन्हाळकर हे ठरले. पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाºया कर्मचाºयांना स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर केले जाते.तसेच मूळचे कसबा बावड्यातील गणपत पिंगळे यांना राष्ट्रपती पोलीस पदक तर मूळचे दिंडनेर्लीचे पोलीस उपनिरीक्षक शीतलकुमार डोईजड यांना राष्टÑपती शौर्यपदक जाहीर झाले.दत्तात्रय मासाळ हे मूळचे धनगर गल्ली, कसबा बावडा येथील. त्यांनी कुस्तीमध्ये विशेष प्रावीण्य मिळविले. ते १९८७ मध्ये पोलिसांत भरती झाले. त्यानंतर कोल्हापूर पोलीस दलात करवीर, जुना राजवाडा, शहर वाहतूक शाखा, गांधीनगर, कागल गगनबावडा, पोलीस मुख्यालय नियंत्रण कक्ष, आदी ठिकाणी सेवा बजावली. त्यांची आतापर्यंत ३२ वर्षे सेवा झाली असून, त्यांना उत्कृष्ट कामगिरीबाबत १९२ बक्षिसे मिळालेली आहेत. यापूर्वी त्यांना २०१२ मध्ये पोलीस महासंचालकांकडून सन्मानचिन्ह बहाल झाले होते. त्यानंतरही त्यांची कामगिरी उल्लेखनीय राहिल्याने त्यांचा सेवापट पुन्हा विशेष राष्ट्रपती पोलीस पदकासाठी दिल्ली येथे पाठविला होता. त्यांनी आतापर्यंत खून, खुनाचा प्रयत्न, दरोडे, घरफोडी, चेन स्नॅचिंग, चोरी, आदी गंभीर गुन्ह्णांची उकल केली आहे.पोलीस हवालदार वसंत पन्हाळकर यांचे मूळ गाव पेठवडगाव (ता. हातकणंगले). १२ एप्रिल १९८७ रोजी पोलीस दलात कॉन्स्टेबलपदी भरती झाले. पन्हाळकर यांच्यावर प्रत्येक अधिकाºयाचा विश्वास होता. तत्कालीन पोलीस अधीक्षक माधवराव सानप, विशेष पोलीस महानिरीक्षक भगवंतराव मोरे, तुकाराम चव्हाण अशा वरिष्ठ अधिकाºयांसमवेत त्यांनी सात ते आठ वर्षे उत्कृष्ट सेवा बजावली. ‘एक गाव, एक गणपती’ योजना यशस्वी होण्यासाठी नेमलेल्या पथकात पन्हाळकर यांचा समावेश होता. सांगली येथील राज्य क्रीडा स्पर्धेत भगवंतराव मोरे यांच्यासमवेत ते पथकात होते. आजरा येथील जातीय दंगल शमविण्यासाठी असणाºया पथकातही त्यांचा समावेश होता. त्यांच्या अशा ३१ वर्षांच्या सेवेत २४९ बक्षिसे मिळाली आहेत. यापूर्वी त्यांना पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. आतापर्यंत त्यांनी पोलीस मुख्यालय, जुना राजवाडा, शहर वाहतूक शाखा, नेसरी, लक्ष्मीपुरी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, आदी ठिकाणी काम केले.कसबा बावड्याचे पिंगळे राष्ट्रपती पदकाचे मानकरीठाणे शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत दिनकर पिंगळे हे राष्ट्रपती पोलीस पदकाचे मानकरी ठरले. ते कसबा बावडा येथील रहिवासी आहेत. कोल्हापूरचे सुपुत्र गणपत पिंगळे यांना राष्टÑपती पदक जाहीर होताच ते राहत असलेल्या धनगर गल्ली, कसबा बावडा येथे जल्लोष झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये पिंगळे यांनी शिक्षण घेत १९९१ मध्ये पोलीस उपनिरीक्षकपदी भरती झाले. त्यानंतर २००१ मध्ये सहायक पोलीस निरीक्षकपदी बढती मिळाली. सध्या ते ठाणे शहरला वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून सेवा बजावीत आहेत. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण राजाराम विद्यालयात झाले, तर पदवीचे शिक्षण महावीर कॉलेजमध्ये झाले. कुस्ती, कबड्डी खेळामध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे. त्यांचे भाऊ श्रीकांत पिंगळे हे सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक म्हणून सेवा बजावत आहेत. आई-वडील शेती करतात. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.दिंडनेर्लीच्या पोलीस उपनिरीक्षक शीतलकुमार डोईजड यांना राष्टÑपती शौर्यपदकदिंडनेर्ली : करवीर तालुक्यातील दिंडनेर्लीचे सुपुत्र पोलीस उपनिरीक्षक शीतलकुमार डोईजड यांना राष्ट्रपती शौर्यपदक जाहीर झाले आहे. सध्या ते गडचिरोली येथे सेवा बजावत आहेत.नक्षलवाद्यांशी सहावेळा झुंज देणाºया आणि तीन वर्षांत पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घालणाºया गडचिरोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शीतलकुमार डोईजड यांना यापूर्वी पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. शीतलकुमार यांनी जानेवारी २०१६ रोजी छत्तीसगडमध्ये जाऊन नक्षलवाद्यांच्या छावणीवर हल्ला करून दोन नक्षलवाद्यांना यमसदनी धाडले. त्याचवर्षी १२ फेब्रुवारीला महाराष्ट्र -छत्तीसगड पोलिसांच्या संयुक्त मोहिमेत त्यांनी तीन नक्षलवाद्यांचा खात्मा केला. याशिवाय त्यांनी नक्षलवाद्यांचे खरे स्वरूप आदिवासींना समजावून सांगितले. मुलांसाठी महाराष्ट्र दर्शन सहल काढून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. बेरोजगारांसाठी प्रकल्प राबवून वाहने पुरविली. नक्षलवाद्यांचा सुळसुळाट असलेल्या ठिकाणी जाऊन जनजागृती मेळावे घेतले. आदिवासींना सरकारी योजनांचे महत्त्व पटवून दिले.