शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळा नको, ग्रामस्थांच्या बैठकीत बंद ठेवून साखळी उपोषणाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 15:41 IST

पन्हाळा : जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळा गडचा समावेश नको म्हणून ग्रामस्थांनी रविवारी घेतलेल्या दुसऱ्या बैठकीत कडाडून विरोध करण्याचा ...

पन्हाळा : जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळागडचा समावेश नको म्हणून ग्रामस्थांनी रविवारी घेतलेल्या दुसऱ्या बैठकीत कडाडून विरोध करण्याचा निर्णय घेतला असून, उद्या, मंगळवारी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन दहा एप्रिलपर्यंत ग्रामस्थांसमोर जागतिक वारसा स्थळांचे नियम व कायदेविषयक माहिती लिखित स्वरूपात जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावी, असा शासनावर दबाव आणण्याचा निर्णय ग्राम बैठकीत घेण्यात आला. बैठकीला सुमारे पाचशे ग्रामस्थ उपस्थित होते.जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळ्याचे नाव निश्चित झाल्याने यापूर्वी या यादीत जैसलमेर किल्ला गेला आहे. तेथे कोणते नियम लागले आहेत, याची पाहणी व अभ्यास दौऱ्यासाठी पन्हाळगडावरून पाचजणांचे शिष्टमंडळ जैसलमेर येथे जाऊन तेथील शासकीय, नगरपरिषद व ग्रामस्थांबरोबर चर्चा करून जनतेवर कोणकोणते जाचक नियम लादले आहेत, त्याचे विश्लेषण बैठकीत त्यांनी सांगितले. जैसलमेर येथील व पन्हाळगडावरची परिस्थिती वेगळी असल्यामुळे जागतिक वारसा यादीत पन्हाळगडाचा समावेश नसावा असा निर्णय ग्रामबैठकीत घेतला. शासकीय अधिकारी ग्रामस्थांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेत आहेत, त्यामुळे ग्रामस्थ व शासन यांच्यात दुही निर्माण झाली आहे. यात प्रामुख्याने पर्यटकांवर अवलंबून असणाऱ्या लहानमोठ्या व्यावसायिकांमध्ये असंतोष आहे.पन्हाळा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत जाताना पन्हाळा ग्रामस्थांना विश्वासात घेतले जात नसल्याने व वारसा यादीत पन्हाळ्याचा समावेश होत असताना पन्हाळगडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात सांगितले होते की, पन्हाळा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात होता तसा ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहील म्हणजे नेमके येथील रहिवासी असलेल्या लोकांचे काय होणार, हा संभ्रम दूर करणे शासनाकडून अपेक्षित आहे. त्यामुळेच पन्हाळा जागतिक वारसा यादीत समावेश होण्यासाठी स्थानिक पातळीवर विरोध होऊ लागला आहे. यात पहिल्या टप्प्यात बंद पाळणे व साखळी उपोषणाचा इशारा दिला आहे.टॉवर, टाकी हटवणारदूरध्वनी व आकाशवाणीचे मनोरे (टाॅवर) यांना जोतिबा डोंगरावर प्रत्येकी दहा गुंठे जागा देण्यात आली व त्यांना प्रत्येकी सहा कोटी रुपये देऊन पन्हाळगडावरून त्यांना स्थलांतर करण्यास सांगितले आहे. पाठोपाठ पन्हाळा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उंच पाण्याची टाकी पाडण्यासाठी सांगितले आहे. हे पन्हाळा नागरिकांना विश्वासात न घेता घेतलेले निर्णय आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFortगड