शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

देशातील स्वच्छ शहरांत पन्हाळा नगरपरिषद प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 17:45 IST

पन्हाळा - केंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छ भारत सर्वेक्षण २०२० चे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. पन्हाळा शहर ...

ठळक मुद्देदेशातील स्वच्छ शहरांत पन्हाळा नगरपरिषद प्रथम यादी जाहीर, पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेने पटकावला क्रमांक

पन्हाळा - केंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छ भारत सर्वेक्षण २०२० चे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. पन्हाळा शहर देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरलं आहे. सलग तिसऱ्यांदा पन्हाळ्याने बाजी मारली आहे.

देशात पंचवीस हजार लोकसंख्येत दहाव्या स्थानावर तर पश्चिमेकडील पाच राज्यात पहिल्या स्थानावर पन्हाळा सर्वात स्वच्छ शहर ठरलं आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये पन्हाळा शहर स्वच्छ शहरात राज्यात तिसऱ्या व देशात सहाव्या क्रमांकावर होते. केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने हरदीपसिंह पुरी यांनी याची घोषणा केली आहे. स्वच्छ भारत सर्वेक्षणचं हे पाचवं वर्ष आहे.

स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०२० हे २८ दिवसांमध्ये पूर्ण करण्यात आलं होतं. स्वच्छता ॲपवरुन १ कोटी ७० लाख लोकांनी अभियानासाठी नोंदणी केली होती. सोशल मीडियावरुन ११ कोटी लोकांनी अभियानाला प्रतिसाद दिला. तर साडे पाच लाखांहून अधिक स्वच्छता कामगारांना सामाजिक कल्याणकारी योजनांशी जोडण्यात आलं होतेगतवर्षी स्वच्छ सर्वेक्षण अभियानमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक ४५ पुरस्कार पटकावून देशात अव्वल स्थान मिळविलं यात पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदचे नांव होते. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राला तिसरे स्थान मिळालं होतं.

पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेने पाच महत्वाचे निकष पुर्ण केलेने ५१२०.९४ असे गुण प्राप्त केले

  • पन्हाळा शहरात प्रत्येक घरासह सार्वजनिक संडास बांधुन गाव हगणदारी मुक्त केले
  •  शहरातील सार्वजनिक कचरा उठाव व्यवस्थापन उत्तम तप्तहेने केले गेले तर गांव प्लास्टिक मुक्त केले
  • घराघरातील ओला व सुका कचरा सकाळी नऊच्या आत गोळा करण्यास सुरवात केली
  • सर्व ओल्या कचऱ्याचे गांडुळ खतात रुपांतर केले व त्याची विक्री केली
  • सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांना चांगली वागणुक व दर्जेदार आरोग्य सुविधा 

फटाके वाजवुन, गुलाल उधळुन आनंद

पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा रुपाली धडेल या पहिला क्रमांक आल्याने भावनाविवश होत माझ्या कारकीर्दीतील अविस्मरणीय दिवस सांगत सर्व पन्हाळा नगरवासीयांचे आभार मानले. पन्हाळा नगरवासीयांनी स्वच्छता अभीयानात पहिला क्रमांक आल्याने फटाके वाजवुन व गुलाल उधळुन आनंद व्यक्त केला

 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानkolhapurकोल्हापूर