गडहिंग्लज - गडहिंग्लज उपविभागाच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर व गडहिंग्लजचे तहसीलदार दिनेश पारगे यांनी आज, शुक्रवारी (९) पुन्हा आपल्या पदाची सूत्रे स्विकारली.कोरोनालढ्यासह येथील कार्यकाळात उत्तम कामगिरी असतानाही आठवड्यापूर्वी महसूल विभागाने त्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या होत्या.परंतु, त्यांची पदस्थापना करण्यात आली नव्हती.त्यामुळे त्यांनी 'मॅट'मध्ये दाद मागितली होती.दरम्यान,नूतन प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे व तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी येथील सूत्रे घेतली होती.तथापि, गुरूवारी(८) झालेल्या सुनावणीत पांगारकर व पारगे यांच्या मुदतपूर्व आणि नियमबाह्य बदलीला 'मॅट'ने स्थगिती दिली.त्यामुळे त्यांनी पुन्हा आपल्या पदाची सूत्रे स्विकारली.यासंदर्भात केवळ 'लोकमत'नेच आवाज उठवला होता.
पांगारकर,पारगे यांनी पुन्हा सुत्रे स्विकारली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 13:34 IST
transfar, kolhapurnews, gadhinglaj, Tahasildar गडहिंग्लज उपविभागाच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर व गडहिंग्लजचे तहसीलदार दिनेश पारगे यांनी आज, शुक्रवारी (९) पुन्हा आपल्या पदाची सूत्रे स्विकारली.
पांगारकर,पारगे यांनी पुन्हा सुत्रे स्विकारली !
ठळक मुद्देपांगारकर,पारगे यांनी पुन्हा सुत्रे स्विकारली !मॅट'मध्ये मागितली होती दाद