शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कुस्ती जिंकला, पण जगण्यात हरला; अवघ्या २२ वर्षीय पंढरपूरच्या पैलवानाचा कोल्हापुरात हृदयविकाराने मृत्यू

By तानाजी पोवार | Updated: October 4, 2022 18:13 IST

दसऱ्यानिमित्त व्हन्नूर (ता. कागल) येथे कुस्ती मैदानात त्याने दोन नंबरची कुस्ती जिंकून वाहवा मिळवली. पण नियतीने घाला घातला.

कोल्हापूर : कुस्तीच्या सरावासाठी कोल्हापुरात कळंबा परिसरातील राष्ट्रकुल कुस्ती संकुल या तालमीत वास्तव्यास असणाऱ्या पैलवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने सोमवारी रात्री मृत्यू झाला. मारुती हरिदास सुरवसे (वय २२, रा. वाखरी, ता. पंढरपूर) असे त्याचे नाव आहे. त्याच्या मृत्यूमुळे कुस्ती क्षेत्रात हळहळ व्यक्त झाली. कुस्ती जिंकून आला; परंतु नियतीने त्याला जीवनाच्या लढाईत मात्र एवढ्या लहान वयात हरवले.सुमारे ११० किलो वजन असलेला व अवघा २२ वर्षांचा मारुती सुरवसे हा गेल्या पाच महिन्यांपासून पैलवान राम सारंग यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रकुल कुस्ती संकुलात सराव करत होता. त्यापूर्वी तो सांगलीत कुस्तीचे धडे गिरवत होता. सोमवारी दसऱ्यानिमित्त व्हन्नूर (ता. कागल) येथे कुस्ती मैदानात त्याने दोन नंबरची कुस्ती जिंकून वाहवा मिळवली. रात्री कोल्हापुरात कुस्ती संकुलात परतल्यानंतर रात्री सव्वादहा वाजता त्याच्या छातीत दुखू लागले.सहकाऱ्यासोबत दुचाकीवरून औषध आणण्यासाठी जाताना वाटेतच छातीत कळ आल्याने तो दुचाकीवरून रस्त्यावरच पडला. त्याला तातडीने उचलून खासगी रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी त्याला शासकीय रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्याला रुग्णवाहिकेतून सीपीआर रुग्णालयात आणले; पण उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पैलवान मारुतीचे वडील शेती करतात, घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

लहानपणापासूनच कुस्तीची आवड मारुतीला लहानपणापासूनच कुस्तीची आवड होती. कुस्तीतच करिअर करण्यासाठी त्याला कोल्हापुरात तालमीत कुस्ती सरावासाठी पाठवले. त्याने निळपण (ता. भुदरगड), चिकोडी आदी ठिकाणी कुस्त्या गाजवल्या. त्याच्या मृत्यूची बातमी समजताच त्याचा भाऊ, चुलते, मामा व इतर नातेवाईक पहाटेच कोल्हापुरात आले. सीपीआर रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह वाखरी येथे नेण्यात आला. पंधरा दिवसांपूर्वी शंकर चौगुले या पैलवानाचा रंकाळा खणीत बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर मारुती याच्या मृत्यूमुळे कुस्ती क्षेत्रात हळहळ व्यक्त झाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWrestlingकुस्तीHeart Attackहृदयविकाराचा झटका