शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दुकानदारांनाही मिळणार पेन्शन? योजना या वर्ष अखेरीस सुरू होण्याची शक्यता
2
वक्फबाबत सुप्रीम कोर्टाचे अंतरिम आदेश; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
मुंबईचा फलंदाज बाद झाला, माघारी परतत असतानाच तिसऱ्या पंचांना दिसली यष्टीरक्षकाची घोडचूक, मग...
4
ठाणे: पट्टे, रॉड अन् बांबूने लहानग्यांना मारहाण, बालआश्रमातील वास्तव; ४ मुलींवर झाले अत्याचार
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२५: धन व कीर्ती यांची हानी संभवते
6
'टी. एन. शेषन यांनी मागितले होते गृहमंत्रिपद', माजी राज्यपालांच्या पुस्तकात खळबळजनक दावा
7
ठाण्यातील १,३०० झाडांवर कुऱ्हाड चालविण्याचा विकासकाचा ‘डाव’, वृक्षांचे वय लपवल्याचे वनविभागाच्या पाहणीत उघड
8
"इंडस्ट्रीतील प्रत्येक महिलेसोबत त्याचे शरीरसंबंध...", अमृता रावची बहीण प्रीतिकाचे टीव्ही अभिनेत्यावर गंभीर आरोप
9
समृद्धी महामार्गावरून मेपासून जा सुसाट; मुंबई ते नागपूर केवळ आठ तासांचा प्रवास
10
मध्य रेल्वेवर रविवारी खोळंबा, सीएसएमटी-विद्याविहारदरम्यान पाच तासांचा मेगाब्लॉक
11
विशेष लेख : बाळासाहेब ठाकरे नाशिकहून ‘लाइव्ह’..., आपल्या नेत्यांचे विचारच बदलायचे?
12
मुंबईतील ३६ विधानसभांसाठी भाजपचे १०८ मंडल अध्यक्ष, कोअर कमिटीच्या बैठकीत आज होणार शिक्कामोर्तब
13
वक्फ मालमत्तांचा दर्जा ५ मेपर्यंत रद्द होणार नाही; केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयाला हमी
14
अग्रलेख: तुही भाषा कंची? अशी सक्ती करायचे कारण नाही
15
शेअर बाजाराचा चौकार, ६.३७ टक्क्यांनी वाढला सेन्सेक्स; सलग चौथ्या दिवशी बाजारात वाढ
16
चार मुलींचा स्कूल बसमध्ये लैंगिक छळ, स्कूल बसच्या क्लिनरविरोधात गुन्हा दाखल
17
"न्यायालये राष्ट्रपतींना कालमर्यादा आखून देऊ शकत नाहीत; ‘सुपर पार्लमेंट’सारखे वागू नये"
18
महेश मांजरेकर यांना व्ही. शांताराम जीवन गौरव, भीमराव पांचाळे, अनुपम खेर, काजोल, मुक्ता बर्वेंचा सन्मान
19
NASHIK FIRE BREAKING VIDEO: नाशिकमध्ये अग्निकल्लोळ! प्लायवूड फॅक्टरीला भीषण आग; १८ बंब पोहोचले, तरीही...
20
परत पदावर येऊन धनंजय मुंडेंच्या हातून समाजसेवा घडावी; नामदेवशास्त्रींचे विधान, जरांगे भडकले

पाऊले चालती पंढरीचा वाट; ४ वारकऱ्यांपासून सुरू झाली दिंडी, आता १५० सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 20:37 IST

चांदे येथील या दिंडीला जवळपास २०० वर्षाची परंपरा आहे. प्रत्येक वर्षी अखंडीतपणे माघवारीसाठी येथून दिंडीचे प्रस्थान होते.

श्रीकांत ऱ्हायकर

कोल्हापूर - मनामध्ये सावळ्या विठ्ठलाची आस, मुखामधे हारिनामाचा गजर, सोबतीला टाळमृदंगाचा गजर व खांद्यावर भगवी पताका डोईवर  घेऊन ग्याण्बा तुकारामचा जयघोष करत भक्तीमय वातावरणात आज चांदे (ता. राधानगरी) येथील दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. या दिंडीत जवळपासच्या चाळीस वाडया वस्त्यातील १५० वारकरी सहभागी झाले आहेत.         

चांदे येथील या दिंडीला जवळपास २०० वर्षाची परंपरा आहे. प्रत्येक वर्षी अखंडीतपणे माघवारीसाठी येथून दिंडीचे प्रस्थान होते. महिणाभराच्या पायी प्रवासानंतर ही दिंडी पंढरपूरमध्ये पोहचते. तत्पुर्वी चांदे येथील मुकूंद महाराजांच्या समाधिला आभिषेक करून ही दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होते. या दिंडीचे मालक माऊली महाराज चांदेकर यांच्या व्यवस्थापणाखाली या दिंडीची परंपरा सद्या अखंडीतपणे सुरू आहे. पायी दिंडीची इतक्या वर्षाची परंपरा असणारी ही जिल्हयातील एकमेव दिंडी आहे.        

ब्रम्हीभूत मुकंद महाराजांच्या पाचव्या पिढीतील त्यांचे वंशज त्यांनी घालून दिलेल्या या पायी दिंडीची परंपरा चालवत आहेत. या संपूर्ण दिंडी सोहळ्यामध्ये सामील होणाऱ्या सर्व वारकऱ्यांना प्रेम भावनेने सांभळण्याचे काम मुकुंदजांचे वंशज करत आहेत. अवघ्या चार वारकऱ्यांपासून सुरू केलेल्या या पायी दिंडीच्या सोहळ्यात सद्या पंढरपूरपर्यंत शेकडो वारकरी सहभागी होत असल्याचे दिंडी मालक मुकुंद महाराजांचे म्हणणे आहे . पंढरपुरमध्ये माघ एकादशी दिवशी नगर प्रदक्षिनेचा मान या दिंडीला असतो . शिवाय वास्कर महाराजांच्या फडामध्ये ही या  दिंडीला मान आहे. शनिवारी दुपारी दोन वाजता चांदे येथील मुकूंद महाराजांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतल्यानंतर तेथील धार्मिक कार्यक्रमांची सांगता होऊन जवळपास २०० वारकऱ्यांसह ही दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली . यावेळी दिंडीचे मालक माऊली महाराज चांदेकर व संपूर्ण सोनवले कुटुंबीय या सोहळ्याच्या ठिकाणी हजर होते . चांदे पंचक्रोशीतील ग्रामस्तांनी भक्तीमय वातावरणात दिंडीला निरोप दिला . 

टॅग्स :PandharpurपंढरपूरPandharpur Wariपंढरपूर वारीkolhapurकोल्हापूर