शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

पूरमुक्त कोल्हापूरसाठी पंचगंगेचे पुनरुज्जीवन आवश्यक :  राजेंद्रसिंह राणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 18:48 IST

पूरमुक्त कोल्हापूर होण्यासाठी पंचगंगा नदीचे पुनरुज्जीवन करण्यासह या नदीपात्रातील जमिनीची होणारी धूप थांबविणे आवश्यक आहे; त्यासाठी नदीपात्रालगत, त्याच्यामागे असणाऱ्या शेती, परिसरात झाडे लावणे, असलेले गवत टिकविण्याचे काम लोकांकडून व्हावे. नाला म्हणून ओळख झालेली जयंती, गोमतीला नदीचा दर्जा देण्यात यावा, असे प्रतिपादन जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी बुधवारी केले.

ठळक मुद्देपूरमुक्त कोल्हापूरसाठी पंचगंगेचे पुनरुज्जीवन आवश्यक :  राजेंद्रसिंह राणाशिवाजी विद्यापीठाने जलसाक्षरतेचा उपक्रम राबवावा

कोल्हापूर : पूरमुक्त कोल्हापूर होण्यासाठी पंचगंगा नदीचे पुनरुज्जीवन करण्यासह या नदीपात्रातील जमिनीची होणारी धूप थांबविणे आवश्यक आहे; त्यासाठी नदीपात्रालगत, त्याच्यामागे असणाऱ्या शेती, परिसरात झाडे लावणे, असलेले गवत टिकविण्याचे काम लोकांकडून व्हावे. नाला म्हणून ओळख झालेली जयंती, गोमतीला नदीचा दर्जा देण्यात यावा, असे प्रतिपादन जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी बुधवारी केले.शिवाजी विद्यापीठ आणि असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस् अ‍ॅन्ड इंजिनिअर्स कोल्हापूरतर्फे ‘जागे व्हा, पंचगंगेसाठी’ या अभियानांतर्गत आंतरराष्ट्रीय जल दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहातील या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, तर कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी प्रमुख उपस्थित होते.

डॉ. राणा म्हणाले, कोल्हापूरमधील जलस्रोत, नदीच्या पुनरुज्जीवनासाठी सुरूअसलेले काम पाहून आनंद झाला. गेल्या काही वर्षांतील चुकांमुळे जयंती, गोमती नदीची नाला नोंद म्हणून झाली आहे. ती पुन्हा नदी म्हणून होण्यासाठी आयुक्त कलशेट्टी यांनी प्रयत्न करावेत. जयंती, गोमतीमध्ये ज्या ठिकाणी सांडपाणी मिसळते, त्या ठिकाणी प्रक्रिया केंद्र उभारल्यास पाणी शुद्धीकरण प्रक्रियेचा खर्च शंभरपटीने कमी होईल.

विद्यापीठ परिसरात पडणारा पाऊस, या ठिकाणी असणारी पाण्याची गरज लक्षात घेऊन जलव्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. त्यानुसार पाऊल टाकल्याने आज विद्यापीठ पाणीदार झाले आहे. पिण्याचे आणि वापराचे पाणी स्वतंत्रपणे ठेवण्याचे चांगले व्यवस्थापन विद्यापीठाकडून होते. दर्जा, वापरानुसार पाणी स्वतंत्र ठेवल्यास त्यांच्या शुद्धीकरणासाठी कमी खर्च येतो. विद्यापीठाने महाविद्यालयांमध्ये जलसाक्षरता उपक्रम राबवावा.आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, शिवाजी विद्यापीठातील एनएनएसचे काम खूप चांगले आहे. जलसाक्षरतेसह लॅब टू लँड काम होणे आवश्यक आहे. ‘सागरमित्र’चे संस्थापक विनोद बोधनकर म्हणाले, पर्यावरण रक्षणासाठी शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्रबोधन व्हावे.

कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, डॉ. राणा यांच्या मार्गदर्शन, प्रेरणेतून विद्यापीठाने जलव्यवस्थापन केले आहे. जलसाक्षरतेचा उपक्रम राबविला जाईल. या कार्यक्रमास कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डी. आर. मोरे, जयदीप बागी, उदय गायकवाड, गौरी चोरगे, अनिल कानडी, आदी उपस्थित होते. पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. पी. डी. राऊत यांनी स्वागत केले. असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्स कोल्हापूरचे अध्यक्ष अजय कोराणे यांनी प्रास्ताविक केले. आरती परीट, आसावरी जाधव यांनी सूत्रसंचालन केले. वंदना कुसाळकर यांनी आभार मानले. 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर