शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगेच्या पातळीत दीड फुटाने वाढ : १४ बंधारे पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 12:04 IST

जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर पावसाची रिपरिप राहिली. धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून, नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

ठळक मुद्देपर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे.

कोल्हापूर : जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर पावसाची रिपरिप राहिली. धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून, नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीच्या पातळीत २४ तासांत दीड फुटाने वाढ झाली असून, ती वाढ २० फुटांवर आहे. १४ बंधारे पाण्याखाली आहेत.

गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, आजरा व चंदगड तालुक्यांत जोरदार पाऊस सुरू आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात ४५२.७२ मिलिमीटरची नोंद झाली आहे. आजरा व गगनबावडा तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू आहे. राधानगरी, तुळशी, दूधगंगा धरणक्षेत्रातही सरासरी ९० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. घटप्रभा धरणक्षेत्रात तब्बल १५४ मिलिमीटर पाऊस झाला. हे धरण पूर्णक्षमतेने भरले असून, प्रतिसेकंद ३५२२ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोदे धरण ६४, तर कडवी धरण ४४ टक्के भरले आहे. राधानगरी व तुळशी ३५ टक्के, तर वारणा २९ व दूधगंगा १६ टक्के भरले आहे.

नद्यांच्या पातळीत वाढ होत असून, पंचगंगेची पातळी २० फुटांपर्यंत पोहोचली आहे. पंचगंगा नदीवरील सात, भोगावती नदीवरील तीन, वेदगंगा नदीवरील चार असे १४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत; यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे.तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये असा-हातकणंगले (६.३८), शिरोळ (६.२९), पन्हाळा (२०.४३), शाहूवाडी (४०.५०), राधानगरी (४६.१७), गगनबावडा (८२), करवीर (२४.३६), कागल (२४.१४), गडहिंग्लज (२६.८६), भुदरगड (४६.६०), आजरा (८०), चंदगड (४९).

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीRainपाऊस