शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगेच्या पातळीत साडे सहा फुटांची वाढ, संततधार पाऊस, ९४ बंधारे पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 13:24 IST

कोल्हापूर जिल्ह्यात गेले दोन दिवस संततधार पाऊस सुरू असून धरणक्षेत्रातही धुवादार पाऊस सुरू आहे. धरणांतून विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असून दिवसभरात पंचगंगा नदीच्या पातळीत तब्बल साडे सहा फुटांनी वाढ झाली. पंचगंगेने पुन्हा इशारा पातळीकडे आगेकूच केल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शाहूवाडी तालुक्यातील कडवी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.

ठळक मुद्देपंचगंगेच्या पातळीत दिवसभरात पाच फुटांची वाढ, संततधार पाऊस, ९४ बंधारे पाण्याखालीधरणांतून विसर्ग वाढला : नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

कोल्हापूर : जिल्ह्यात गेले दोन दिवस संततधार पाऊस सुरू असून धरणक्षेत्रातही धुवादार पाऊस सुरू आहे. धरणांतून विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असून दिवसभरात पंचगंगा नदीच्या पातळीत तब्बल साडे सहा फुटांनी वाढ झाली. पंचगंगेने पुन्हा इशारा पातळीकडे आगेकूच केल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शाहूवाडी तालुक्यातील कडवी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.गेले दोन दिवस गगनबावडा, चंदगड, आजरा, राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यांत मुसळधार; तर उर्वरित तालुक्यांत जोरदार पाऊस कोसळत आहे. गगनबावडा तालुक्यात १२४.५०, चंदगड तालुक्यात १३०. ८३, तर आजरा तालुक्यात ११६.२५ मिलिमीटर पाऊस झाला. शाहूवाडी तालुक्यातील कडवी धरण भरले असून कडवी, कासारी, कुंभी, तुळशी, भोगावतीसह पंचगंगा नदीचे पाणी झपाट्याने वाढत आहे.  

जिल्ह्यात सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत पंचगंगेची पातळी ३७ फुटांपर्यंत पोहोचली आहे. आतापर्यंत ९४ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. राधानगरीचे पाच स्वयंचलित दरवाजे खुले झाले असून वारणा धरणातून १४ हजार ४८६ व दूधगंगा धरणातून १२ हजार ९५० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

राजाराम बंधारा पाणी पातळी  ३७  फूट ७  इंंच इतकी आहे. (पंचगंगा नदी इशारा पातळी - ३९ फूट व धोका पातळी - ४३फूट आहे)  एकुण पाण्याखालील ९४ बंधारे आहेत.  राधानगरी धरणाचे तीन, पाच, सहा आणि चार हे स्वयंचलित दरवाजे उघडले असुन विसर्ग ७११२ क्युसेक आहे.   तुळशी- ८८४, वारणा-१४४८६, दुधगंगा- १२९५०, कासारी- १७५०, कडवी -२५१९, कुंभी - ६५०, पाटगाव - १०७२ , चित्री -२००५, जंगमहट्टि- ६३४ , घटप्रभा -२७२४, जांबरे-२२६५ आणि  कोदे येथून  ८१८ क्युसेक विसर्ग सुरु आहे.

 

राजापूर बंधारा पाणी पातळी  ४१ फुट ० इंच आहे (धोका पातळी : ५८ फुट इशारा पातळी:  ५३ फुट)  नृसिंहवाडी  पाणीपातळी सध्या ५० फुट  ० इंच आहे (धोका पातळी ६८ फुट  इशारा पातळी  ६५ फुट)शिरोळ  पाणीपातळी सध्या ५२'६"फुट आहे  (धोका पातळी : ७८ फुट इशारा पातळी-:  ७४ फुट आहे)इचलकरंजी  पाणीपातळी सध्या ६० फुट  ६ इंच आहे( धोका पातळी : ७१ फुट  इशारा पातळी-: ६८ फुट  )  तेरवाड  पाणी पातळी सध्या ५५ फुट ० इंच आहे( धोका पातळी :  ७३ फुट इशारा पातळी -: ७१ फुट) 

कोयना धरण पाणी पातळी ६५६.३८७ मी सध्या ९२.३९ टि .एम्. सि ( ८७.७४ टक्के) आवक ११४९८०, जावक विसर्ग ५५९५८ आहे  अलमट्टि पाणी पातळी सध्या  ५१८.८० मी, १०९.७६ टि.एम.सि.आहे  आवक १२७५८२ व  जावक विसर्ग २५०००० आहे. 

पावसाला गारठा!डोंगरभागात तर पाऊस सुपाने ओतल्यासारखा पडत असल्याने माणसांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. त्यात या पावसाला कमालीचा गारठा जाणवत असल्याने दिवसभर अंगातून हुडहुडी जात नाही.मघा झटका देणार?मागील नक्षत्र काळात शेतीस उपयुक्त पाऊस झाला. गेले १५ दिवस कमी-अधिक प्रमाणात पाऊस राहिला. सूर्याने रविवारी सायंकाळी सात वाजून ११ मिनिटांनी मघा नक्षत्रात प्रवेश केला आहे. त्याचे वाहन म्हैस असून या काळात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.२० सर्कलमध्ये अतिवृष्टीजिल्ह्यात सर्वच तालुक्यांत जोरदार पाऊस कोसळत असून ७६ पैकी २० महसुली सर्कलमध्ये अतिवृष्टी झाली आहे. शाहूवाडी व चंदगड तालुक्यांतील प्रत्येकी पाच सर्कलचा यामध्ये समावेश आहे.पडझड १६.५२ लाखांचे नुकसानआजरा, चंदगड, गडहिंग्लज, शाहूवाडी तालुक्यांत २८ खासगी मालमत्तांची पडझड होऊन १६ लाख ५२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घरांची सर्वाधिक पडझड आजरा व चंदगड तालुक्यांत झालेली आहे.कोल्हापूरकर पुन्हा धास्तावलेगेले दोन दिवस धुवाधार पाऊस सुरू आहे. त्यात धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने पुन्हा महापुराचे संकट समोर आहे. त्यामुळे कोल्हापूरकर धास्तावले आहेत.दृष्टिक्षेपात दिवसभरातील पाऊस

  • पंचगंगेच्या पातळीत वाढ - ३५ फूट
  • बंधारे पाण्याखाली - ९४
  • मार्ग बंद - सहा

धरणातील वाढलेला विसर्ग प्रतिसेकंद घनफूट :

  • राधानगरी - १४२८
  • वारणा - १५०२
  • दूधगंगा - ९४५०

हातकणंगले- २५.२५(४३१.६३), शिरोळ- २०.७१ (३५४), पन्हाळा- ६९.४३ (१२१८.५७), शाहूवाडी- ७३ (१५१५), राधानगरी- ८९ (१६५२.८३), गगनबावडा-१२४.५० (४१३३), करवीर- ६७.५५ (८९१.२७), कागल-६१.७१(१०९६.८६), गडहिंग्लज- ६०.४३ (७७७.४३), भुदरगड-९४.४०(१२६७.४०), आजरा- ११६.२५(१७९८.७५), चंदगड- १३०.८३(१८६६.१७)  

 

 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर