शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

आजरा, भूदरगडमधील पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 18:38 IST

collector Kolhapur- महसूल जत्रा उपक्रमातंर्गत जिल्ह्यात पाणंद रस्ते अतिक्रमण मोहीमेने आता गती पकडली आहे. आजरा आणि भूदरगडमधील १०५ गावांच्या कामांची सुरुवात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पिंपळगाव ता. भूदरगड येथून बुधवारी केली. जेसीबी चालकांना स्वत: सुचना देत तात्काळ कामे सुरु करण्यासही त्यांनी सांगितले. या कामाचा दोन तालुक्यातील ६ हजार ५९ शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

ठळक मुद्देआजरा, भूदरगडमधील पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त होणार जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन: महसूल जत्रेअंतर्गत उपक्रम

कोल्हापूर: महसूल जत्रा उपक्रमातंर्गत जिल्ह्यात पाणंद रस्ते अतिक्रमण मोहीमेने आता गती पकडली आहे. आजरा आणि भूदरगडमधील १०५ गावांच्या कामांची सुरुवात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पिंपळगाव ता. भूदरगड येथून बुधवारी केली. जेसीबी चालकांना स्वत: सुचना देत तात्काळ कामे सुरु करण्यासही त्यांनी सांगितले. या कामाचा दोन तालुक्यातील ६ हजार ५९ शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.भूदरगड तालुक्यातील पिंपळगाव येथील कामत पाणंदचे काम स्वत: जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी बोलताना देसाई यांनी ग्रामस्थांनी सामंजस्याने आणि सर्वसंमतीने पाणंद व रस्ते खुले करण्यासाठी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा आणि या कामात सहकार्य करावे, असे आवाहन केले.स्वागत विद्याधर परीट यांनी केले. सरपंच विश्वनाथ कुंभार यांनी प्रास्तविक केले. यावेळी भुदरगड उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, तहसिलदार अश्विनी वरुटे, जिल्हा परिषद सदस्य रोहिणी आबिटकर, सरपंच विश्वनाथ कुंभार, उपसरपंच उदय मिसाळ, पंचायत समिती माजी सभापती स्नेहल परीट, मंडळ अधिकारी रामदास लांब, तलाठी दयानंद कांबळे, विलास चव्हाण, सी. एच. चौगुले, अरुण पाटील, माजी सभापती जगदीश पाटील, ग्रामसेवक बोडके माजी सरपंच बाळासाहेब खतकर, चंद्रकांत शेवाळे, अशोक पाटील, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व कर्मचारी, गावातील सर्व महिला बचत गटाचे पदाधिकारी व सदस्य सर्व तरुण मंडळांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर