शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरकरांच्या जेवणात पाकिस्तानचा मिठाचा ‘खडा’, सैंधव मीठ म्हणून विक्री 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 16:11 IST

सैंधव मीठ हे आयुर्वेदिक असून, जेवण बनविण्यासाठी हे मीठ उपयुक्त असल्याचा विक्रेत्यांचा दावा

कोल्हापूर : पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील खाणींमध्ये तयार होणाऱ्या सैंधव मिठाची सध्या कोल्हापूर शहरातील विविध भागांमध्ये विक्री केली जात आहे. राजस्थानमधील पाच ते सहा विक्रेते टेंबलाई मंदिराजवळील उचगाव रस्त्यावर ट्रॅक्टरमधून या मिठाची विक्री करीत आहेत. बीपी, शुगर, मुतखड्यावर सर्वांत गुणकारी म्हणून याची जाहिरात केल्याने ‘आहे स्वस्त, आरोग्यालाही मस्त’ला भुरळून खरेदीसाठी कोल्हापूरकरांच्या उड्या पडत आहेत. मात्र, मोठमोठ्या दगड स्वरूपात उघड्यावर विक्रीसाठी ठेवलेले हे मीठ खरेच सैंधव आहे का, आरोग्याला चांगले आहे का, त्याची शुद्धता किती? याची अन्न व औषधी प्रशासनाकडून तपासणी होणे गरजेचे आहे. तांबूस रंगाचे सैंधव व राजस्थानमध्ये जडीबुटीतून तयार केलेल्या काळ्या मिठाची विक्री केली जात आहे. सैंधव मीठ ६०, तर काळे मीठ ७० रुपये दराने विक्री केली जाते. टेंबलाई मंदिराजवळ पाच ते सहा ट्रॅक्टर ट्रॉलीत दगडाच्या आकाराचे मिठाचे खडे ठेवण्यात आले आहेत.

पाकच्या सिंध प्रांतामधून अमृतसरमध्ये पुरवठापाकिस्तानातील सिंध प्रांतात सैंधव मिठाच्या खाणी आहेत. हे मीठ आरोग्याला चांगले असल्याने भारतासह जगभरात त्याला मागणी आहे. सिंध प्रांतामधून पंजाबच्या अमृतसरमध्ये त्याचा पुरवठा केला जातो. त्यानंतर राजस्थानमधील विक्रेते देशभरात त्याची विक्री करतात.

विक्रेत्यांचा दावा

सैंधव मीठ हे आयुर्वेदिक असून, जेवण बनविण्यासाठी हे मीठ उपयुक्त आहे. आरोग्याच्या सर्व तक्रारींवर हे मीठ गुणकारी असल्याचा दावा विक्रेते राहुल रजपूत यांनी केला. राजस्थानमध्ये तयार होणारे काळे मीठ पाणीपुरीसाठी वापरले जाते.

कोल्हापूर शहरात अशा मिठाची विक्री होत असेल तर या मिठाची तपासणी करण्यात येईल. - तुषार शिंगाडे, सहायक आयुक्त, अन्न व औषधी प्रशासन, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPakistanपाकिस्तान