शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

‘पहलगाममधून बाहेर पडलो अन् हल्ला...’ ढगफुटीमुळे अडकलेले १० पर्यटक परतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 06:48 IST

प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय असलेले साळोखे हे पत्नी व त्यांच्या माहेरचे नातेवाईक असे १० जण जम्मू-काश्मीर येथे पर्यटनाला गेले होते. अ

कोल्हापूर : ‘देशाचे नंदनवन पाहण्याची इच्छा कुणाला नसते, आम्ही १० तारखेला निघालो. रविवारी पहलगामला पाेहोचलो. तीन दिवस तिथे होतो. हल्ला झालेले ठिकाण आमच्या हॉटेलपासून अवघ्या २ ते ३ किलोमीटर अंतरावर. मंगळवारी दुपारी अडीच वाजता हॉटेलमधून बाहेर पडलो आणि हल्ल्याची बातमी आली.. काही तासांपूर्वी आम्ही ज्या नंदनवनात होतो, तिथे आता निष्पापांचे रक्ताचे डाग लागले आहेत हा विचारही वेदनादायी आहे.

आनंदाने सुरू झालेल्या पर्यटनाच्या परतीच्या आठवणी मात्र कायमस्वरूपी दु:खद घटनेची साक्ष देतील...’ ढगफुटीमुळे काश्मीरमध्ये अडकलेले कोल्हापुरातील साने गुरुजी वसाहत येथील युवराज साळोखे कुटुंब गुरुवारी दुपारी सुखरूप पोहोचले. यावेळी त्यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली.

तीन दिवस पहलगाममध्ये प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय असलेले साळोखे हे पत्नी व त्यांच्या माहेरचे नातेवाईक असे १० जण जम्मू-काश्मीर येथे पर्यटनाला गेले होते. अमृतसर, वैष्णोदेवी, श्रीनगर, गुलमर्ग करून ते रविवारी पहलगामला आले. रविवार, सोमवार व मंगळवारी दुपारपर्यंत असे तीन दिवस ते पहलगाममध्ये होते. 

काही अंतरावरच हल्ला  हल्ला झाला ते ठिकाण हॉटेलपासून २ ते ३ किलोमीटरच्या अंतरावर आहे. आदल्या दिवशी सोमवारीच साळोखे कुटुंब त्या ठिकाणी होते. मंगळवारी दुपारी त्यांनी पहलगाम सोडले. वाटेतच त्यांना पहलगाममध्ये हल्ला झाल्याचे कळाले. त्याचदरम्यान ढगफुटीमुळे रस्ते वाहून गेल्याचे कळाले आणि ते अडकले. 

 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला