शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

चंदगडमध्ये पावणेतीन लाखाचा मद्यसाठा जप्त, दोघांना अटक : दोन दिवसांची कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 12:21 IST

आंबेवाडी फाटा (ता. चंदगड) येथे पावणेतीन लाखाचा विदेशी मद्याचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पकडला. याप्रकरणी वाहन चालक शिवाजी धाकलु गावडे (वय ३२, रा. पार्ले, गावडे गल्ली, ता. चंदगड), संजय साताप्पा नाईक (रा. हलकर्णी, ता. चंदगड) या दोघांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

ठळक मुद्देचंदगडमध्ये पावणेतीन लाखाचा मद्यसाठा जप्तदोघांना अटक : दोन दिवसांची कोठडी

कोल्हापूर : आंबेवाडी फाटा (ता. चंदगड) येथे पावणेतीन लाखाचा विदेशी मद्याचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पकडला. याप्रकरणी वाहन चालक शिवाजी धाकलु गावडे (वय ३२, रा. पार्ले, गावडे गल्ली, ता. चंदगड), संजय साताप्पा नाईक (रा. हलकर्णी, ता. चंदगड) या दोघांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.अधिक माहिती अशी, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपआयुक्त वाय. एम. पवार व अधीक्षक गणेश पाटील यांनी भरारी पथकाला जिल्ह्याच्या सीमारेषेवर गस्त वाढवून कारवाईचे आदेश दिले होते.

त्यानुसार २ मार्चला चंदगड तालुक्यातील पाटणे फाटा, मोटणवाडी, हेरे, पारगड या रोडवर भरारी पथक गस्त घालत असताना आंबेवाडी फाटा येथे सुमोगाडी भरधाव मोटणवाडीच्या दिशेने जात असताना दिसून आली.

तिचा पाठलाग करुन थांबवून तपासणी केली असता गाडीमध्ये विदेशी मद्याचे बॉकस मिळून आले. संशयित शिवाजी गावडे याचेकडे चौकशी केली असता त्याने संजय नाईक याच्या घरातून आनलेचे सांगितले.

त्यानुसार नाईक याच्या घरावर छापा टाकून आणखी मद्यसाठा जप्त केला. नाईक याने गोव्याहून विक्रीसाठी मद्यसाठा आनला होता. ही कारवाई निरीक्षक संभाजी बरगे, जगन्नाथ पाटील, किशोर नडे, जवाण संदीप जानकर, सचिन काळे, सागर शिंदे यांनी केली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर