शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
4
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
5
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
6
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
7
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
8
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
9
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
10
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
11
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
12
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
13
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
14
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
15
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
16
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
17
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
18
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
19
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
20
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली

‘के. पीं.’ना नडला अती आत्मविश्वास

By admin | Updated: October 24, 2014 00:16 IST

विरोधक एकत्र : के .पी. हटाव मोहीम यशस्वी

संजय पारकर - राधानगरी -विरोधक कधी एकत्र येऊच शकत नाहीत. त्यामुळे आपला विजय निश्चित आहे, अशा फाजील आत्मविश्वासामुळेच गाफील राहिलेल्या के. पी. पाटील यांचा पराभव झाला. ऐनवेळी कॉँग्रेसच्या काही नेत्यांना गळाला लावण्यात यशस्वी होऊनही तरुणाईचा उत्साह व के. पी. हटावसाठी काय पण, ही कॉँग्रेसची खेळी यशस्वी ठरल्याने प्रकाश आबिटकर यांना दुसऱ्या प्रयत्नातच आमदारकी मिळालीे.१९९९ च्या पराभवानंतर २००४ च्या निवडणुकीत तत्कालीन आमदार बजरंग देसाई यांना हटविण्यासाठी काही कॉँग्रेस नेत्यांनी अपक्ष लढलेल्या के. पीं.ना साथ दिली होती. त्यामुळे त्यांचा विजय झाला. पाच वर्षांपूर्वी षट्कोनी लढतीमुळे पुन्हा त्यांचा एकतर्फी विजय झाला. या दोन्ही वेळा विखुरलेले विरोधक हेच प्रमुख कारण त्यांच्या विजयात महत्त्वाचे ठरले होते. एकूण मतदानांपैकी सुमारे ३५ ते ४० टक्के मतदान राष्ट्रवादीला मानणारे होते. विरोधातील मतांची विभागणी झाली असती तर चित्र वेगळे असते.गतवेळी अपक्ष लढून सुमारे ३५ हजार मतांपर्यंत मजल मारणाऱ्या प्रकाश आबिटकर यांना लोकसभा निवडणुकीत अंदाज घेण्याची संधी मिळाली. राष्ट्रवादीच्या मतात कॉँग्रेसची मतेही होती; पण त्याचे श्रेय घेताना राष्ट्रवादीने कॉँग्रेसला बेदखल केले. तेथूनच पुन्हा ठिणगी पडली. शिवसेनेला लोकसभेवेळी मिळालेल्या मतांमध्ये फारशी घट होण्याचे काहीच कारण नसल्याने आबिटकर यांनी शिवसेनेची उमेदवारी घेतली. येथेच त्यांना निम्मे यश मिळाले होते. दोन महिने निकराचे प्रयत्न करूनही आघाडी तुटल्याने बजरंग देसाई यांना उमेदवारी मिळाली; पण त्यात के. पीं.नाच फायदा होणार हे स्पष्ट होते. शिवाय करवीरमधील खेळीमुळे बजरंग देसाई यांनी माघार घेतली. देसाई व अरुण डोंगळे वगळता कॉँग्रेस नेत्यांनी के. पी. हटावसाठीच आबिटकर यांची पाठराखण केली.पाच वर्षांत २६६ कोटींची कामे केल्याचा दावा के. पीं.कडून ठळकपणे झाला; पण मतदारसंघातील रस्ते व्यवस्थित नाहीत. भोगावती कारखान्याच्या नोकरभरतीचे पडसादही उमटले. ‘बिद्री’ची जादा दर देण्याची खेळी अयशस्वी झाली. शेकाप-जनता दल अशा मित्रपक्षांनी दिलेला पाठिंबा कामी आलेला नाही. सर्वांत जास्त वाताहत झाली ती स्वाभिमानी शेतकरी संघटनेची. त्यांची अनामत जप्त झाली. गतवेळी राष्ट्रवादीला साथ दिलेल्या आजरा तालुक्याची राजकीय फेरमांडणी झाली. त्यामुळे मोजकी गावे वगळता सर्वत्र एकतर्फी मतदान झाल्याचे स्पष्ट झाले. आजही राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या गावांतूनही शिवसेनेला मताधिक्य मिळाले.तरुण आबिटकर यांना नवमतदारांसह तरुणांचा मोठा पाठिंबा मिळाला. परिवर्तन करायचेच, अशा ईर्ष्येने पेटलेल्या तरुणांमध्ये आपला उमेदवार अशी प्रतिमा निर्माण करण्यात यश आल्याने प्रकाश आबिटकर यांना मोठे यश मिळाले. त्यांच्यावर विश्वास टाकलेल्या तरुणाईला अपेक्षित असलेला विकास करण्याचे मोठे शिवधनुष्य ते कसे पेलतात, यावर त्यांची पुढील वाटचाल अवलंबून असणार आहे.