शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

पडद्यामागील ‘हाता’ने ‘पी. एन.’ यांचा विजय सुकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 11:39 IST

मागील दोन पराभवामुळे यावेळची निवडणूक पाटील यांच्यासाठी अस्तित्वाची होती; त्यामुळे ‘यंदा साहेबच’ ही टॅगलाईन घेऊन कार्यकर्त्यांनीच निवडणूक हातात घेतली होती.

ठळक मुद्देपराभव खंडित करत पी. एन. पाटील यांना विजयी गुलाल लागण्यात या टीमचे योगदान फार मोठे आहे.

कोल्हापूर : कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी ‘करवीर’मधून दणदणीत विजय संपादन केला. यामागे त्यांच्यासह कुटुंबाचे कष्ट आहेच; पण गेली दोन महिने पडद्यामागील जोडण्या लावत, त्या यशस्वी करून पाटील यांना गुलाल लावण्यापर्यंत राबणारे ‘हात’ अनेक आहेत. यामध्ये प्रामुख्याने ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, बाळासाहेब खाडे, ‘करवीर’चे सभापती राजेंद्र सूर्यवंशी, भारत पाटील-भुयेकर, अ‍ॅड. शाहू काटकर, बाळासाहेब मोळे, जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील या प्रमुखांचा उल्लेख करावाच लागेल. ‘यंदा साहेबच’ ही टॅगलाईन हातात घेत कार्यकर्त्यांनीच निवडणूक हातात घेतली आणि विजयश्री खेचून आणला.

राजकारणात यशस्वी व्हायचे असल्यास कुटुंबाची भक्कम साथ लागते, त्याचबरोबर विश्वासू कार्यकर्त्यांची ताकदही महत्त्वाची असते. पी. एन. पाटील यांनी आतापर्यंत विधानसभेच्या सहा निवडणुका लढविल्या; पण त्यांच्या भोवतीच्या कार्यकर्त्यांचे मोहोळ कधी कमी झाले नाही. कार्यकर्त्यांसाठी वाटेल ते करण्याची त्यांची तयारी असते; त्यामुळेच कार्यकर्तेही त्यांच्यासाठी जीवावर उदार होऊन मैदानात उतरतात. मागील दोन पराभवामुळे यावेळची निवडणूक पाटील यांच्यासाठी अस्तित्वाची होती; त्यामुळे ‘यंदा साहेबच’ ही टॅगलाईन घेऊन कार्यकर्त्यांनीच निवडणूक हातात घेतली होती. गेली तीन-चार महिने ‘गोकुळ’चे संचालक विश्वास पाटील, बाळासाहेब खाडे व त्यांच्या टीमने अतिशय नियोजनबद्धरीत्या बांधणी केली.

विश्वास पाटील यांचा गेली ३0 वर्षे ‘गोकुळ’च्या माध्यमातून मतदारसंघात संपर्क आहे; त्यामुळे कोणता गट जवळ येऊ शकतो; त्यासाठी कोणत्या क्लृप्त्या वापरल्या पाहिजेत, याचा ठोकताळा त्यांच्याकडे होता. महिला मेळाव्याच्या माध्यमातून त्यांनी वातावरण निर्मितीस सुरुवात केली. विरोधकांच्या आरोपाबरोबरच डाव प्रतिडावावर त्याच ताकदीने प्रहार करण्याची रणनीती त्यांच्या टीमने अतिशय चाणाक्षपणे हाताळली. महिनाभर तर घरदार सोडून अतिशय आक्रमकपणे प्रचारयंत्रणा यशस्वी केली. पराभव खंडित करत पी. एन. पाटील यांना विजयी गुलाल लागण्यात या टीमचे योगदान फार मोठे आहे. 

जनतेमधूनच मोठा उठाव होता, आमदार पी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचारयंत्रणा दिवसेंदिवस गतिमान करत गेलो. विशेष म्हणजे गावागावांतील कार्यकर्त्याने जीवाचे रान केल्याने मोठे मताधिक्य मिळाले.- विश्वास पाटील (संचालक, ‘गोकुळ’) 

 

टॅग्स :karvir-acकरवीरElectionनिवडणूकMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019