शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पी. बी. सावंत यांचे कोल्हापूरशी ऋणानुबंध : शाहू विचारांचा पाईक हरपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 17:58 IST

Kolhapur Pbsawant News- सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश पी. बी. सावंत यांच्या निधनामुळे कोल्हापुरातील चळवळीतील कार्यकर्त्यांना धक्का बसला. ६ डिसेंबर १९९९ रोजी त्यांना केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या हस्ते मानाच्या राजर्षी शाहू पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यावेळच्या आठवणी सोमवारी जागविण्यात आल्या. शाहू विचारांचा पाईक हरपल्याची भावनाही त्यांच्या निधनानंतर व्यक्त झाली.

ठळक मुद्देपी. बी. सावंत यांचे ऋणानुबंध : शाहू विचारांचा पाईक हरपलाकरवीरनगरीने केला होता शाहू पुरस्काराने सन्मान

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश पी. बी. सावंत यांच्या निधनामुळे कोल्हापुरातील चळवळीतील कार्यकर्त्यांना धक्का बसला. ६ डिसेंबर १९९९ रोजी त्यांना केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या हस्ते मानाच्या राजर्षी शाहू पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यावेळच्या आठवणी सोमवारी जागविण्यात आल्या. शाहू विचारांचा पाईक हरपल्याची भावनाही त्यांच्या निधनानंतर व्यक्त झाली.सावंत आणि दिवंगत नेते गोविंदराव पानसरे, बाबूराव धारवाडे यांचे घनिष्ट संबंध होते. त्यांच्याच स्नेहामुळे सावंत हे काही कार्यक्रमानिमित्त कोल्हापूरला येत असत. १९९९ चा शाहू पुरस्कार सावंत यांना जाहीर झाला. परंतु, चंद्रचूड यांची तारीख न मिळाल्याने पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम ६ डिसेंबर १९९९ला केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये घेण्यात आला होता.

या कार्यक्रमाला कोल्हापूरवासीयांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी कोल्हापूर बार असोसिएशनच्यावतीनेही त्यांचा सत्कार करण्यात आला होता. कोल्हापूरच्या पुरोगामी चळवळीविषयी त्यांना आस्था होती.इचलकरंजी येथील समाजवादी प्रबोधिनीचे शांताराम गरूड यांच्याशी त्यांचे घनिष्ट संबंध होते. प्रबोधिन प्रकाश ज्योती या नियतकालिकाचे नियमित वाचन करून ते नेहमी संपर्क साधत असत, अशी आठवण प्रबोधिनचे सचिव प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितली.पदावर असताना लिहिले पत्रशिवाजी कोण होता हे पुस्तक वाचल्यानंतर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदावर असतानाही सावंत यांनी गोविंदराव पानसरे यांना पत्र लिहून त्यांचे अभिनंदन केले होते. प्रमुख कार्यकर्त्यांपर्यंत हे पुस्तक पोहोचण्याची गरज असून तशी योजना आपण आखावी, अशी अपेक्षाही त्यांनी पत्रात व्यक्त केली होती. अशी आठवण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर यांनी सांगितली. 

 

एका नि:स्पृह, प्रामाणिक, समाजाशी नाळ जुळलेल्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो आहोत. निवृत्तीच्या काळातही कुलगुरू निवडीपासून ते गुजरात दंगलीपर्यंतची, तेथील भ्रष्ट सताधाऱ्यांची चौकशी करण्याची कामगिरी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्यांच्या नि:स्पृह स्वभावाची यामुळे साक्ष मिळते. सावंत यांच्या निधनामुळे केवळ न्यायालय आणि कायद्याशी संबंधितच नव्हे, तर समाजाचीही हानी झाली आहे.- ॲड. अभय नेवगी,उच्च न्यायालयाचे वकील

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर