शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

Kolhapur: कॅन्सरचे उपचार घेत जिंकली दहावीची लढाई, वरणगे पाडळीच्या रवींद्र कांबळेच्या जिद्दीची गोष्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 13:53 IST

सॉफ्टवेअर इंजिनिअर होण्याचा मानस

प्रयाग चिखली : ब्लड कॅन्सरवर मात करत वरणगे पाडळीतील भैरवनाथ हायस्कूलचा विद्यार्थी चेतन रवींद्र कांबळे याने जिद्दीने ७१.८० टक्के गुण मिळवत दहावीची लढाई जिंकली.मूळचे पन्हाळा तालुक्यातील वेतवडे येथील रवींद्र ज्ञानदेव कांबळे यांचे कुटुंब वरणगे पाडळी येथे वास्तव्यास आहे. घरचे अठरा विसवे दारिद्र्य असल्यामुळे ते पत्नी सुवर्णा, मुलगा चेतन आणि मुलगी प्रतीक्षा यांच्यासह वरगणेतील रणजीत नलगे यांच्या शेतावर चार वर्षांपूर्वी शेतमजूर म्हणून काम करण्यासाठी आले. त्यातच मुलगा चेतन याला इयत्ता आठवीमध्ये ब्लड कॅन्सर झाल्याचे निदान झाले आणि कांबळे कुटुंबावर दुःखाचे आभाळ कोसळले. एक वर्ष मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये रेडिएशन व कॅन्सरचे उपचार घेतले. सध्या रेडिएशनची प्रक्रिया पूर्ण होऊन त्याच्यावर औषधोपचार सुरू आहेत. 

नववीचे पूर्ण वर्ष केमोथेरपीमध्ये गेले. दहावीमध्ये या सगळ्यावर मात करत केवळ सात महिने चेतनला शाळेत जाता आले. आईवडील शेतमजूर, घरची परिस्थिती बिकट, त्यातच ब्लड कॅन्सरसारखा दुर्धर आजार या सर्वांवर मात करत चेतनने मिळवलेले यश प्रेरणादायी असेच आहे. चेतनला शिक्षक जगन्नाथ परीट, विष्णू यादव, अनिल सपकाळे, मुख्याध्यापक ए.जी. पाटील यांच्याबरोबरच मामा संदीप माळवी, सुनील माळवी तसेच आई सुवर्णा, वडील रवींद्र व लहान बहीण प्रतीक्षा यांचे पाठबळ लाभले. भविष्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर बनण्याचे चेतनचे ध्येय आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSSC Resultदहावीचा निकाल