शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

गार्डन क्लब स्पर्धेत विद्यापीठाच्या उद्यान विभागाला सर्वसाधारण विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 11:13 IST

Agriculture Sector Kolhapur- कोल्हापूर येथील गार्डन क्लब आणि राजर्षी शाहू महाराज कृषी महाविद्यालयाने घेतलेल्या सुवर्णमहोत्सवी पुष्प प्रदर्शन व स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाचा उद्यान विभाग ४० गटांत सहभागी झाला. त्यापैकी ३० गटांत यश मिळविले. १२ गटांत प्रथम क्रमांक, १२ गटांत द्वितीय क्रमांक आणि ६ गटांत तृतीय क्रमांक पटकावून स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केले.

ठळक मुद्देशहराच्या फुप्फुसाची देखभाल करणाऱ्या श्रमिकांचाच सन्मान कुलगुरू, प्र-कुलगुरूंकडून अभिनंदन

कोल्हापूर : येथील गार्डन क्लब आणि राजर्षी शाहू महाराज कृषी महाविद्यालयाने घेतलेल्या सुवर्णमहोत्सवी पुष्प प्रदर्शन व स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाचा उद्यान विभाग ४० गटांत सहभागी झाला. त्यापैकी ३० गटांत यश मिळविले. १२ गटांत प्रथम क्रमांक, १२ गटांत द्वितीय क्रमांक आणि ६ गटांत तृतीय क्रमांक पटकावून स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केले.या निमित्त उद्यान विभागाच्या सहकाऱ्यांचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी अभिनंदन केले. उद्यान विभागाला सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त होणे म्हणजे कोल्हापूर शहराच्या फुप्फुसाची देखभाल करणाऱ्या श्रमिकांचाच सन्मान आहे. या विभागाने पुढील पाच वर्षांचा आराखडा तयार करावा. विद्यापीठाचे उद्यान राज्यात सर्वोत्कृष्ट बनविण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. शिर्के यांनी केले.

यावेळी उपकुलसचिव डॉ. जी. एस. कुलकर्णी, डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, अभियांत्रिकी विभागाचे मेस्त्री गणपती मस्ती, उद्यान विभागाचे अधीक्षक अभिजीत जाधव, हेडमाळी संभाजी कांबळे, संजय सोनुले, माळी सुरेश वागवेकर उपस्थित होते.उद्यान विभागाने मिळविलेली पारितोषिकेक्लास-१: गुलाब (एकच फूल) पांढरा- प्रथम क्रमांक, फिका गुलाब- प्रथम व तृतीय, नारिंगी- द्वितीय व तृतीय, गडद पिवळा- प्रथम व द्वितीय, मिश्र रंग व इतर- प्रथम, क्लास-७ (फुले). डेलिया, मिनी डेलिया- प्रथम, झिनिया- द्वितीय, ॲस्टर, कर्दळ- तृतीय, शेवंती- द्वितीय व तृतीय, झेंडू व सालव्हिया, निशिगंध- प्रथम व द्वितिय, जास्वंद आणि इतर फुले, दुरंगी- द्वितिय, क्लास-९ (कुंड्यांतील रोपे), कोलीयस- प्रथम, बेगोनिया- तृतीय, इतर झाडे (फुलांशिवाय) आणि इतर झाडे (फुलांसह)- व्दितीय, औषधी व सुगंधी वनस्पती- द्वितिय व तृतीय. 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रkolhapurकोल्हापूर