शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

कोल्हापूर जिल्ह्यातील २०० गुन्हेगार हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 00:41 IST

कोल्हापूर: जिल्ह्यात संघटित गुन्हेगारी टोळीद्वारे खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, ठार मारण्याची धमकी, जबरी चोरी, प्राणघातक शस्त्रांनिशी बेकायदेशीर जमाव जमवून सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करणे, आदी गंभीर गुन्हे करणाऱ्या जिल्ह्यातील दोनशे गुंडांना एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी बुधवारी दिली.आगामी शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...

कोल्हापूर: जिल्ह्यात संघटित गुन्हेगारी टोळीद्वारे खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, ठार मारण्याची धमकी, जबरी चोरी, प्राणघातक शस्त्रांनिशी बेकायदेशीर जमाव जमवून सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करणे, आदी गंभीर गुन्हे करणाऱ्या जिल्ह्यातील दोनशे गुंडांना एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी बुधवारी दिली.आगामी शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साही वातावरणात पार पडावी, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस दल मेहनत घेत आहे. संवेदनशील भागात सशस्त्र संचलनासह लोकांमध्ये प्रबोधन केले जात आहे. पैशांसाठी वाटेल ते करणारे येथील गुन्हेगार दंगल घडवून आणण्यामध्येही आघाडीवर असल्याचे चित्र आहे. महापुरुषांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यातील सुमारे दोनशे गुन्हेगारांना हद्दपार केल्याचे मोहिते यांनी सांगितले.महालिंगपुरे टोळीचा समावेशशहापूर आणि हातकणंगले पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील अवैध व्यावसायिक व गुन्हेगारी क्षेत्रातील टोळीप्रमुख हणमंत जाधव, दस्तगीर महालिंगपुरे यांच्यासह २४ जणांना वर्षासाठी हद्दपार केले आहे. त्यामध्ये हणमंत निवृत्ती जाधव (रा. संत मळा, इचलकरंजी), संदीप प्रकाश कोरवी, अक्षय अर्जुन भोसले, प्रवीण शंकर कांबळे (जवाहरनगर, इचलकरंजी), जयसिंग केशव मछले (रा. खोतवाडी), अजय दगडू खामकर (रा. वेताळपेठ, इचलकरंजी), सुरेश तुकाराम रणदिवे, शशिकांत महादेव जाधव, विलास बापू सूर्यवंशी, लाला गुडेलाला कुशवाह (तिघे, रा. तारदाळ, ता. हातकणंगले), सुरेश विठ्ठल बंगाडी (रा. कबनूर, ता. हातकणंगले), नूरमहमंद ऊर्फ समीर बाबू मुल्ला (रा. आसरानगर, इचलकरंजी), सुधाकर बापू हेरवाडे (रा. कारंडे मळा, इचलकरंजी), झाकीरहुसेन आबालाल शेख (रा. हनुमाननगर, इचलकरंजी), दस्तगीर हसन महालिंगपुरे, अजित दामोदर मोरे (रा. कुंभोज, ता. हातकणंगले), विवेक मुरलीधर लोहार (रा. कोरोची), किरण विश्वास भंडारी, भगवान ज्ञानू शेटे, संदीप बाबासाहेब भेंडगुले (सर्व, रा. नरंदे), गजानन पुंडलिक काकडे (रा. आळते, ता. हातकणंगले), राकेश शरद गायकवाड (रा. धनगर गल्ली, हातकणंगले), संतोष विष्णू कुपटे (गणपती कट्टा, जवाहरनगर, इचलकरंजी), शशिकांत पांडुरंग पाटील (रा. वेताळ चौक, हातकणंगले)२१ लॉजचे परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव‘यात्री निवास’च्या नावाखाली लॉजवर वेश्या व्यवसाय चालविणाºया जिल्ह्यातील २१ लॉजचे परवाने कायमस्वरूपी बंद करा, या मागणीचा लेखी प्रस्ताव जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना सादर केला आहे. कोल्हापूर शहर, इचलकरंजी आणि जयसिंगपूर येथील लॉजचा समावेश आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी बुधवारी दिली.‘लॉज’, ‘यात्री निवास’च्या नावाखाली जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय, कुंटणखाने चालतात. अनैतिक व्यापार प्रतिबंधक विभागाचे पथक, विशेष पथकाने काही लॉजवर छापे टाकून वेश्या व्यवसायांवर कारवाई केली आहे. गेल्या सहा महिन्यांत पोलिसांनी अशा प्रकारच्या लॉज व यात्री निवासांची यादी तयार केली आहे. जिल्ह्यात २५० पेक्षा अधिक लॉज आहेत; मात्र २१ लॉजमध्ये वेश्या व्यवहार चालतो, त्या ठिकाणी वारंवार छापे टाकून कारवाई केली आहे. लॉजमालकांना वेळोवेळी सूचना, कारवाई करूनही त्यांच्यात सुधारणा झालेली नाही. त्यामुळे वादग्रस्त २१ लॉजची यादी तयार करून त्यांचे परवाने रद्द करावेत, असा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांना सादर केला आहे.युवक-युवतींनाप्रवेश देऊ नयेशाळा, महाविद्यालयांतील युवक-युवतींना लॉज, हॉटेलमध्ये प्रवेश देऊ नका? असे आदेश पोलिसांनी लॉजमालकांना दिले आहेत. केवळ व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून लॉजमालक अनैतिक व्यवहारांना प्रोत्साहन देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना वारंवार सूचना करूनही फरक पडत नसल्याने पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असल्याचे पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी सांगितले.