शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील १६ हजार शिक्षकांचे पगार थकले शिक्षण विभागाचा कारभार : आॅनलाईन देयके प्रणालीचा घोळ; सहा महिन्यांपासून शिक्षक मेटाकुटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 01:03 IST

कोल्हापूर : राज्य शासनाच्या शिक्षण विभागाच्या आॅनलाईन देयके प्रणालीचा घोळ सुरू असल्याने राज्यभरातील १६ हजार माध्यमिक शिक्षकांचा पगार किमान सहा

कोल्हापूर : राज्य शासनाच्या शिक्षण विभागाच्या आॅनलाईन देयके प्रणालीचा घोळ सुरू असल्याने राज्यभरातील १६ हजार माध्यमिक शिक्षकांचा पगार किमान सहा महिन्यांपासून थकीत आहे. कोल्हापूरसह काही जिल्ह्यांत

११ महिन्यांचे पगार थकले आहेत. त्यामुळे शिक्षक चांगलेच मेटाकुटीला आले आहेत. हा पगार मिळण्यास मार्च उजाडेल, असे ‘पे युनिट’चे अधीक्षक शंकरराव मोरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.राज्य शासनाकडून ‘प्लॅन’ व ‘नॉन प्लॅन’मधील शाळांतील शिक्षकांचा पगार वेगळा वेगळा होतो. या शिक्षकांना सरासरी प्रत्येकी ४० हजार रुपये पगार आहे. प्लॅनमधील अनुदानित शाळांचा पगार आजपर्यंत प्रत्येक महिन्यांत ६ ते ८ तारखेपर्यंत होत होता; परंतु शालार्थ आॅनलाईन सॉफ्टवेअर प्रणाली उपलब्ध करून देणारी एजन्सी शासनाने बदलली आहे.

आता तर गेल्या १० जानेवारीपासून ही प्रणालीच बंद आहे. त्याशिवाय यासाठी शासनाने निधीही उपलब्ध करून दिलेला नाही. त्यामुळे हा पगार थकला आहे. एक-दोन महिन्यांचा पगार थकल्यास काहीतरी व्यवस्था करणे शक्य होते; परंतु इतक्या महिन्याचा पगार थकल्यामुळे शिक्षक चांगलेच मेटाकुटीला आले आहेत.दर महिन्याचे विमा, गृहकर्ज व इतर मासिक खर्च भागवताना त्यांच्या नाकात दम येऊ लागला आहे. काहींनी सोने तारण कर्जावर पैसे उचलले आहेत. त्यांच्याही मागे सराफांकडून तगादा सुरू झालाआहे.कोल्हापुरात जून २०१७ चे पगार बिल २६ डिसेंबरला पे युनिटला जमा केले आहे; परंतु ते देखील अद्याप मंजूर झालेले नाही.याबाबत अधीक्षक मोरे यांनी सांगितले की, ‘आॅनलाईन वेतन देयके मंजूर करण्यात अडचणी येत असल्याने पगार थकीत आहे, शिवाय निधीही अजून उपलब्ध झालेला नाही. आमच्या पातळीवर पाठपुरावा सुरू आहे.’कमिशनसाठी विलंब : शिक्षकांची तक्रारपगार थकला की शिक्षकांची कुतरओढ होते; परंतु हीच काही अधिकाºयांसाठी कमाईची संधी असल्याची तक्रार काही शिक्षकांनी केली. थकीत पगाराचे अमूक एवढी रक्कम तुम्हाला आता एकदम मिळणार आहे तर त्यातील दहा टक्के आम्हाला द्या, असा दर काढला जातो. काहीवेळा ही टक्केवारी मिळत नाही म्हणूनही पगार थकीत ठेवला जात असल्याच्या तक्रारी आहेत. ही साखळी कोल्हापूरपासून पुणे कार्यालयापर्यंत मजबूत आहे. काही अधिकाºयांची शिक्षकांच्या पगाराला मगरमिठ्ठीच पडल्याची चर्चा शिक्षकांत आहे. 

शिक्षकांचा पगार शासनाच्या चुकीमुळेच थकीत राहतो आणि थकीत पगार मंजुरीसाठी शिक्षण संचालकांची परवानगी घ्यावी, असा आदेश शासनाने १५ जुलै २०१७ ला काढला आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी हे शासनाचेच प्रतिनिधी असताना पुन्हा संचालकांची परवानगी घ्यायची गरज काय?- राजेश वरक अध्यक्ष, माध्यमिक शिक्षक संघ