शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
3
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
4
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
5
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
6
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
7
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
8
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
9
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
10
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
11
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
12
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
13
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
14
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
15
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
16
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
17
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
18
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
19
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
20
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक!, वर्षात दीड हजारांवर आत्महत्या, कोल्हापूर जिल्ह्यात चिंताजनक स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 12:01 IST

बेरोजगारी, अपेक्षाभंग, व्यसनाधिनता, दुर्धर आजार, आर्थिक चणचण आणि अपयशाने खचून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले

उद्धव गोडसेकोल्हापूर : बेरोजगारी, अपेक्षाभंग, व्यसनाधिनता, दुर्धर आजार, आर्थिक चणचण आणि अपयशाने खचून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात १५१० जणांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवल्याची नोंद पोलिस ठाण्यांमध्ये झाली. विशेष म्हणजे यात २० ते ४० वयोगटातील तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. सहज उठून जीवन संपवण्याची वृत्ती वाढल्याने मरण स्वस्त झाल्याचे दिसत आहे. मात्र, यावर कुटुंब, समाज आणि सरकारलाही वेळीच उपाययोजना कराव्या लागतील, असे मानसोपचार तज्ज्ञांचे मत आहे.दगड, विटा भरलेली सॅक पाठीवर बांधून जयसिंगपूरमधील एका डॉक्टरने राजाराम तलावात उडी घेतली. गोव्यातून आलेल्या गर्भवती महिलेने रंकाळ्यात उडी घेऊन जीवन संपवले. या दोन्ही घटना शनिवारी (दि. १३) सकाळी उघडकीस आल्या. दोन्ही घटनांमधील व्यक्ती सुशिक्षित होत्या. स्वतंत्र आणि साधकबाधक विचार करू शकणाऱ्या होत्या, तरीही त्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारून जीवन संपवले. चार दिवसांपूर्वी कसबा बावडा येथे एका शेतकऱ्याने गळफास घेतला. गंगावेशीत एका वृद्धाने राहत्या अपार्टमेंटवरून उडी घेऊन स्वत:ला संपवले, तर पन्हाळा तालुक्यातील माजगाव येथे ८२ वर्षीय वृद्धाने आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली.या काही प्रातिनिधिक घटनांवरून वाढत्या आत्महत्यांची समस्या स्पष्ट होते. शालेय मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अनेकांना जीवनातील संघर्ष नकोसा झाल्याचे दिसत आहे. आत्महत्या करण्यासाठी क्षुल्लक कारणेही पुरेशी ठरत आहेत. परीक्षेत कमी गुण मिळाले किंवा अभ्यासाच्या भीती, स्पर्धा परीक्षांमध्ये मिळालेले अपयश, अपेक्षाभंग, आर्थिक अडचणी, कौटुंबिक वाद, व्यसनाधिनता आणि वाढते मानसिक तणाव आत्महत्यांना कारणीभूत ठरत असल्याचे मत मानसोपचार तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.संवादाचा अभावसोशल मीडियातून आभासी संवादाची साधने वाढली तरी प्रत्यक्षात कुटुंब, नातेवाईक, मित्रांसोबत संवाद कमी झाला आहे. विशेषत: घरात मुलं आई-वडिलांशी मोकळेपणाने बोलत नाहीत. यातून मनाची घुसमट वाढते. त्यामुळे संकट काळात आत्महत्येची प्रवृत्ती वाढते, असे तज्ज्ञांचे मत आहे.गांभीर्याचा अभावगळफास, तणनाशक प्राशन करणे, स्वत:ला पेटवून घेणे, नदीत किंवा तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्यानंतर बहुतांश वेळा आकस्मिक मृत्यू अशी नोंद पोलिसांच्या कागदोपत्री होते. आत्महत्यांची नेमकी आकडेवारी स्पष्ट होत नाही. त्यामुळे शासकीय यंत्रणांकडून ही समस्या गांभीर्याने घेतली जात नसल्याचे दिसत आहे.

गेल्या चार वर्षांत ६,२७७ आत्महत्यावर्ष - आत्महत्या२०२२ - १,६४४२०२३ - १,५१३२०२४ - १,६१०२०२५ - १,५१०

निराशावादी दृष्टिकोन, अपयश पचवता न येणे, कुटुंबातील कमी झालेला संवाद आणि वाढती स्पर्धा यामुळे तरुणांमधील आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. ही समस्या आणखी तीव्र होण्यापूर्वीच यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. - कालिदास पाटील - मानसोपचार तज्ज्

English
हिंदी सारांश
Web Title : Alarming: Over 1500 Suicides in Kolhapur District This Year

Web Summary : Kolhapur faces a suicide crisis, with over 1510 deaths reported this year, predominantly among young adults. Reasons include unemployment, despair, addiction, and financial struggles. Experts emphasize the need for urgent family, societal, and governmental intervention to address this alarming trend.