शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

‘लोकमत’ बाल विकास मंच टॅलेंट शोमध्ये बहारदार सादरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 14:53 IST

गाणी, नृत्य, अभिनय यांसारख्या विविध कलांचे बहारदार सादरीकरण झालेल्या ‘टॅलेंट शो’ने उपस्थित रसिकांची मने जिंकली. ‘लोकमत बाल विकास मंच’ व मार्क अप इंटरनॅशनल यांच्यातर्फे या शोचे आयोजन करण्यात आले.

ठळक मुद्दे‘लोकमत’ बाल विकास मंच टॅलेंट शोबहारदार सादरीकरणाने जिंकली मने...

कोल्हापूर : गाणी, नृत्य, अभिनय यांसारख्या विविध कलांचे बहारदार सादरीकरण झालेल्या ‘टॅलेंट शो’ने उपस्थित रसिकांची मने जिंकली. ‘लोकमत बाल विकास मंच’ व मार्क अप इंटरनॅशनल यांच्यातर्फे या शोचे आयोजन करण्यात आले.शाहू स्मारक भवन येथे गुरुवारी सकाळी झालेल्या या कार्यक्रमाला स्पर्धक, रसिकांचीही चांगलीच गर्दी झाली होती. कार्यक्रमाचे उद्घाटन ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, मार्क अप इंटरनॅशनलचे संचालक अमित पाटील, संचालक निलांबरी शेलार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमासाठी पार्टनर म्हणून ‘ट्रू बॉडी वेलनेस स्टेपअप डान्स अकॅडमी’ यांचे सहकार्य मिळाले आहे.लहान मुलांमधील आत्मविश्वास वाढविणे, त्यांच्यामधील कलागुणांना वाव देण्यासाठी या शोचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी तीन दिवस आॅडिशन घेण्यात आली. यामधून निवडक बालकांना ‘टॅलेंट शो’साठी संधी देण्यात आली. या ‘टॅलेंट शो’मध्ये विद्यार्थ्यांनी दोन मिनिटांमध्ये अ‍ॅक्ट, नृत्य, मिमिक्री, गायन, क्लासिकल डान्स, गिटारवादन यांसारख्या कलागुणांचे सादरीकरण केले.

प्रत्येक स्पर्धकाने सादर केलेल्या परफॉर्मन्सला उपस्थितांकडून चांगलीच दाद मिळत होती. परीक्षक म्हणून मार्क अप इंटरनॅशनलचे संचालक अमित पाटील, निलांबरी शेलार यांनी काम पाहिले. यावेळी आपली कला सादर करून आत्मविश्वास वाढल्याची भावना अनेक स्पर्धकांनी व्यक्त केली.

बाल विकास मंच विजेतेशिवम मगदूम (प्रथम), समीक्षा लाड (द्वितीय), शुभाली म्हैंदरकर (तृतीय). उत्तेजनार्थ : अथर्व बिडकर, श्री दिवाण.

मार्क अप इंटरनॅशनलदोन ते चार वर्षे अनुक्रमे निकाल असा : अधिराज अथणी, किरण शिंपुकडे, विहा गर्ग. पाच वर्षा : सूर्या पोवार, वर्षिका पवार, नारायणी जप्तनमुलखा. सहा वर्षे : सार्वी खरे, गतिग्यान शेलार, सात ते नऊ वर्षे : स्वरा दुधाणे, स्वागत गायकवाड, उन्नती पटेल. १० ते १३ वयोगट : सानवी बासराणी, कबीर घाटगोळकर, हरिप्रिया सावंत, सिमरन नंदवाणी.उद्या फॅशन शोमार्क अप इंटरनॅशनलच्या वतीने शनिवारी डी. वाय. पी. सिटी येथे सायंकाळी ६ वा. शायनी सुपर स्टार या ‘फॅशन शो’ चे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापुरातील बालकांची निवड करण्यात आली आहे. कोल्हापुरात प्रथमच अशा प्रकारचा ‘फॅशन शो’ होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत खुला आहे. तरी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

 

 

 

बहारदार सादरीकरणाने जिंकली मने...‘लोकमत’ बाल विकास मंच टॅलेंट शोचे आयोजनलोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गाणी, नृत्य, अभिनय यांसारख्या विविध कलांचे बहारदार सादरीकरण झालेल्या ‘टॅलेंट शो’ने उपस्थित रसिकांची मने जिंकली. ‘लोकमत बाल विकास मंच’ व मार्क अप इंटरनॅशनल यांच्यातर्फे या शोचे आयोजन करण्यात आले.शाहू स्मारक भवन येथे गुरुवारी सकाळी झालेल्या या कार्यक्रमाला स्पर्धक, रसिकांचीही चांगलीच गर्दी झाली होती. कार्यक्रमाचे उद्घाटन ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, मार्क अप इंटरनॅशनलचे संचालक अमित पाटील, संचालक निलांबरी शेलार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमासाठी पार्टनर म्हणून ‘ट्रू बॉडी वेलनेस स्टेपअप डान्स अकॅडमी’ यांचे सहकार्य मिळाले आहे.लहान मुलांमधील आत्मविश्वास वाढविणे, त्यांच्यामधील कलागुणांना वाव देण्यासाठी या शोचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी तीन दिवस आॅडिशन घेण्यात आली. यामधून निवडक बालकांना ‘टॅलेंट शो’साठी संधी देण्यात आली. या ‘टॅलेंट शो’मध्ये विद्यार्थ्यांनी दोन मिनिटांमध्ये अ‍ॅक्ट, नृत्य, मिमिक्री, गायन, क्लासिकल डान्स, गिटारवादन यांसारख्या कलागुणांचे सादरीकरण केले. प्रत्येक स्पर्धकाने सादर केलेल्या परफॉर्मन्सला उपस्थितांकडून चांगलीच दाद मिळत होती. परीक्षक म्हणून मार्क अप इंटरनॅशनलचे संचालक अमित पाटील, निलांबरी शेलार यांनी काम पाहिले. यावेळी आपली कला सादर करून आत्मविश्वास वाढल्याची भावना अनेक स्पर्धकांनी व्यक्त केली.--------------------बाल विकास मंच विजेतेशिवम मगदूम (प्रथम), समीक्षा लाड (द्वितीय), शुभाली म्हैंदरकर (तृतीय). उत्तेजनार्थ : अथर्व बिडकर, श्री दिवाण.-------------------------मार्क अप इंटरनॅशनलदोन ते चार वर्षे अनुक्रमे निकाल असा : अधिराज अथणी, किरण शिंपुकडे, विहा गर्ग. पाच वर्षा : सूर्या पोवार, वर्षिका पवार, नारायणी जप्तनमुलखा. सहा वर्षे : सार्वी खरे, गतिग्यान शेलार, सात ते नऊ वर्षे : स्वरा दुधाणे, स्वागत गायकवाड, उन्नती पटेल. १० ते १३ वयोगट : सानवी बासराणी, कबीर घाटगोळकर, हरिप्रिया सावंत, सिमरन नंदवाणी.-------------------------लोकमत बाल विकास मंच लोगो वापरणे---------------------उद्या फॅशन शोमार्क अप इंटरनॅशनलच्या वतीने शनिवारी डी. वाय. पी. सिटी येथे सायंकाळी ६ वा. शायनी सुपर स्टार या ‘फॅशन शो’ चे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापुरातील बालकांची निवड करण्यात आली आहे. कोल्हापुरात प्रथमच अशा प्रकारचा ‘फॅशन शो’ होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत खुला आहे. तरी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.---------------------------------२५०४२०१९ - कोल- लोकमतफोटो ओळी : शाहू स्मारक भवन येथे गुरुवारी ‘लोकमत बाल विकास मंच’ व मार्क अप इंटरनॅशनलतर्फे आयोजित ‘टॅलेंट शो’ मधील विजेत्यांसोबत अमित पाटील, निलांबरी शेलार.

 

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटkolhapurकोल्हापूर