शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणाचे नियोजन चुकल्याने नागरिकांतून संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 18:27 IST

Corona vaccine Kolhapur : तब्बल दहा दिवसांनी कोविशिल्ड लस आली खरी; पण महापालिका आरोग्य विभागाकडून लसीकरणाचे योग्य नियोजन न झाल्यामुळे नागरिकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला. एकीकडे पहिला डोस घेऊन ज्यांचे ८४ दिवस पूर्ण झाले त्यांना लस घेण्याबाबत फोन केले जातील, असे सांगितले गेले. पण केंद्रातून फोनही गेले नाहीत आणि केंद्रावर गेल्यावर योग्य माहिती मिळाली नाही. त्यामुळे गुरुवारी काही केंद्रांवर कर्मचारी, नागरिक यांच्यात वादावादीचे प्रकार घडले.

ठळक मुद्देलसीकरणाचे नियोजन चुकल्याने नागरिकांतून संताप पहाटेपासून रांगा : केंद्रावर वादावादीच्या घटना

कोल्हापूर : तब्बल दहा दिवसांनी कोविशिल्ड लस आली खरी; पण महापालिका आरोग्य विभागाकडून लसीकरणाचे योग्य नियोजन न झाल्यामुळे नागरिकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला. एकीकडे पहिला डोस घेऊन ज्यांचे ८४ दिवस पूर्ण झाले त्यांना लस घेण्याबाबत फोन केले जातील, असे सांगितले गेले. पण केंद्रातून फोनही गेले नाहीत आणि केंद्रावर गेल्यावर योग्य माहिती मिळाली नाही. त्यामुळे गुरुवारी काही केंद्रांवर कर्मचारी, नागरिक यांच्यात वादावादीचे प्रकार घडले.बऱ्याच दिवसांच्या तुटवाड्यानंतर कोविशिल्ड लस कोल्हापुरात उपलब्ध झाली. शासकीय नियमाप्रमाणे पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेल्यांची संख्याही वाढली आहे. लसीचे सात हजार डोस प्राप्त झाले, परंतु महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून योग्य नियोजन झाले नाही. नागरिकांपर्यंत प्रशासनाचे नियोजन पोहोचले नाही. त्यामुळे लसीकरणाचा गोंधळ उडाला.

पहिला डोस घेऊन ज्यांचे ८४ ते १०० दिवस पूर्ण झाल्यामुळे लस मिळेल की नाही, याची चिंता लागून राहिली होती. नागरिक मोठ्या अपेक्षेने येऊन पहाटेपासून रांगेत उभे राहिले होते. नागरिकांनी आपापले क्रमांकही ठरविले होते. चार-पाच तास रांगेत उभे राहिल्यानंतर त्यांना आज लस मिळणार नाही, असे कर्मचारी सांगायला लागले. तेव्हा नागरिकांच्या संतापात भर पडली.लसीकरणाचे नियोजन पूर्णपणे चुकल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. सामान्य नागरिकांपर्यंत लसीकरणाची योग्य माहिती न पोहोचणे, केंद्रांवर याद्या उशिरा येणे आणि फोन न होणे हेच गोंधळाचे कारण असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. तसेच दुसऱ्या दिवशी होणाऱ्या लसीकरणाचा तपशील आणि अन्य सूचना आदले दिवशी दुपारपर्यंत जाहीर कराव्यात व त्याचे व्हिडिओ बुलेटिन करावे, अशी सूचना केली. या वेळी सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर, केंद्रप्रमुख डॉ. भिसे उपस्थित होते. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर