बाह्यरुग्ण विभाग आला; पण कर्मचारी कधी येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:25 AM2021-04-10T04:25:35+5:302021-04-10T12:13:45+5:30

Hospital Kolhapur-सेवा रुग्णालय हे सर्व सामान्यांना उत्तम आरोग्य सुविधा देत असून, येथील डाॅक्टर, कर्मचारी उत्तम प्रकारे सेवा देत आहेत. मात्र, सीपीआरमधील बाह्यरुग्ण विभाग इकडे आल्यानंतर तिथे असणारे डाॅक्टर व कर्मचारीही या दवाखान्यात सेवा देण्यासाठी आले पाहिजेत; पण तसे न होता सेवा रुग्णालयात जितका कर्मचारी वर्ग आहे त्यावर येथे कामकाज चालू असल्याने येथील डाॅक्टर व कर्मचाऱ्यांवर ताण येत असून महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी आपला कर्मचारी वर्ग सेवा रुग्णालयात पाठवणे गरजेच आहे.

The outpatient department arrived; But when will the staff come | बाह्यरुग्ण विभाग आला; पण कर्मचारी कधी येणार

बाह्यरुग्ण विभाग आला; पण कर्मचारी कधी येणार

Next
ठळक मुद्देबाह्यरुग्ण विभाग आला; पण कर्मचारी कधी येणारजादा कर्मचारी देण्याची गरज

दीपक जाधव

कदमवाडी : सेवा रुग्णालय हे सर्व सामान्यांना उत्तम आरोग्य सुविधा देत असून, येथील डाॅक्टर, कर्मचारी उत्तम प्रकारे सेवा देत आहेत. मात्र, सीपीआरमधील बाह्यरुग्ण विभाग इकडे आल्यानंतर तिथे असणारे डाॅक्टर व कर्मचारीही या दवाखान्यात सेवा देण्यासाठी आले पाहिजेत; पण तसे न होता सेवा रुग्णालयात जितका कर्मचारी वर्ग आहे त्यावर येथे कामकाज चालू असल्याने येथील डाॅक्टर व कर्मचाऱ्यांवर ताण येत असून महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी आपला कर्मचारी वर्ग सेवा रुग्णालयात पाठवणे गरजेच आहे.

कोरोना काळात जिल्ह्यातील गरीब व सर्वसामान्य रुग्णांना सेवा देणारे रुग्णालय म्हणून सेवा रुग्णालयाकडे पाहिले जाते. प्रत्यक्षात मात्र या 50 बेडच्या रुग्णालयासाठी डॉक्टर व कर्मचारी मिळून ४६ कर्मचारी वर्ग असून कोरोना काळात संपूर्ण जिल्ह्यातील रुग्णांना सेवा देत आहेत.

कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी पूर्ण वेळ विलिनीकरण रुग्णालय आवश्यक असल्याने छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय हे पुढील दहा दिवसांनंतर कोविड रुग्णालय करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले.

त्यानुसार नाॅन कोविड रुग्ण हे सेवा रुग्णालयाकडे येणार असून आदेशामध्ये पुढील दहा दिवसांनंतर म्हटले असतानाही सीपीआरमध्ये येणारे रुग्ण सेवा रुग्णालयात पाठवायला सुरुवात केली आहे. या रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णाला सेवा दिली जाते. मात्र, येथे असणारे डाॅक्टर, कर्मचारी कमी असल्याने येत्या काळात या रुग्णालयातील व्यवस्था कोलमडून पडणार आहे. सध्या हे रुग्णालय 50 खाटांचे असून येथे डाॅक्टर, नर्सेस व शिपाई मिळून 46 कर्मचारी वर्ग आहे. सीपीआरचा बाह्यरुग्ण विभाग येथे चालू होत असला तरी या दवाखान्यात तज्ज्ञ डाॅक्टरांच्या बरोबरच नर्सेस व वाॅर्डबाॅयची गरज असून सध्या येथे एकच वाॅर्डबाॅय काम करत आहे. रुग्णालयाकडे अस्थिरोगतज्ज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, त्वचा रोगतज्ज्ञ नसल्याने रुग्णांची गैरसोय होणार आहे. सध्या सीपीआर कोविड रुग्णालय केल्याने या विभागातील डाॅक्टर व कर्मचारी सेवा रुग्णालयाकडे वर्ग करणे गरजेचे आहे.

विभाग स्वतंत्र करणे गरजेचे

सेवा रुग्णालयामध्ये डाॅक्टर, कर्मचारी कमी असल्याने रुग्णालयावर ताण येत आहे. सीपीआरमधील सर्व विभाग इकडे आल्याने आणखीनच गर्दी व रुग्णाची गैरसोय होणार आहे. त्यापेक्षा प्रशासनाने या रुग्णालयातील डिलिव्हरी विभाग हा सावित्रीबाई फुले हास्पिटल किंवा पंचगंगा हास्पिटलकडे वर्ग करणे गरजेच आहे.

याची आहे आवश्यकता

  • सेवा रुग्णालयात सीपीआरचा बाह्यरुग्ण विभाग चालू झाल्यावर येथे मनुष्यबळ वाढविणे गरजेचे असून यात 20 अपघात विभाग वैद्यकीय अधिकारी,,
  • 20 नर्सेस, 20 वाॅर्डबाॅयची गरज असून तीन शिफ्टमध्ये काम चालत असून एका शिफ्टसाठी 4 डाॅक्टर, 4 नर्सेस व 4 वाॅर्डबाॅयची गरज असते.

 

लसीकरण कक्षही येथेच

सेवा रुग्णालयामध्ये कोरोना लसीकरण कक्ष आहे. या ठिकाणी दररोज 100 लोकांना लसीकरण करणे बंधनकारक असताना देखील या एका कक्षाचे तीन कक्ष करून आहे त्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने दिवसाला 350 ते 400 लोकांना लसीकरण केल जात आहे. जर का सीपीआरचा बाह्यरुग्ण विभाग चालू झाल्यावर या लसीकरण कक्षाचे कामकाजही कोलमडणार आहे.

६७ हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार

गेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यावर सीपीआर मार्च ते नोव्हेंबर 2020 या काळात कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवले होते. या नऊ महिन्यांत सेवा रुग्णालयाने ६७ हजारांहून अधिक रुग्णांना सेवा दिली. यात

  • बाह्यरुग्ण-६०१४७,
  • आंतररुग्ण ३०१८
  • डिलिव्हरी 324,
  • सीझर 109,
  • श्वानदंश 2121,
  • सर्पदंश 355,
  • विष प्राशन 243
  •  अपघात 85
  • भाजलेले 752.
     

नोंदणी सीपीआरमध्ये उपचार सेवामध्ये

जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशानुसार सीपीआरचा बाह्यरुग्ण विभाग दहा दिवसांनंतर सेवा रुग्णालय येथे सुरू करण्याचे आदेश असतानादेखील सीपीआरमधून गुरुवारपासूनच रुग्ण सेवा रुग्णालयात पाठवण्यात येत आहेत. कहर म्हणजे रुग्ण आला की त्याची नोंदणी करून घेतात आणि मग सांगितले जाते की, सीपीआर बंद आहे. सेवा रुग्णालयात जावे. म्हणजे फक्त बाह्यरुग्णाची नोंदणी करून घ्यायची; पण रुग्णच तपासायचे नाहीत. म्हणजे आपण काम करत असल्याचे दाखवले जात आहे.

 

Web Title: The outpatient department arrived; But when will the staff come

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.