शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
2
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
3
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
4
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
5
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
6
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
7
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!
8
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
9
रोकड, सोनंनाणं आणि..., निवृत्त अबकारी अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड    
10
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला धन्वंतरीची आणि लक्ष्मीची पुजा करण्यामागे आहे पौराणिक कारण!
11
बाजारात 'सुपर वेन्सडे'! सेन्सेक्स ८२,६०० पार; गुंतवणूकदारांनी एकाच दिवसात कमावले ४.२९ लाख कोटी
12
'या' कंपनीवर लागला बॅन, शेअर्स आपटले; बोनस शेअर्स देणं आणि शेअर्स स्प्लिटवरही बंदी, कोणता आहे स्टॉक?
13
Mumbai Crime: सफाई करताना दरोडेखोर घुसले; दागिने वाचवणाऱ्या दुकानमालकावर केले वार, घाटकोपरमध्ये ज्वेलर्सला लुटले
14
जखमेवर मीठ! ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, आयसीसीनं ठोठावला दंड
15
निवडणुक आयोगाकडे विरोधकांच्या चकरा म्हणजे 'फियास्को', देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
16
'निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने कारण शोधण्याचा खटाटोप'; शिष्ठमंडळाच्या बैठकीवर शंभूराज देसाईंची टीका
17
Gold Price Today 15 October: आजही सोन्यात तेजी, पण चांदीचे दर घसरले; पाहा १८,२२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर
18
अरे बापरे! तुम्हीही प्लास्टिकचा कोबी खाताय? धक्कादायक Video पाहून व्हाल हैराण
19
दुर्गापूरमध्ये मित्रानेच एमबीबीएस विद्यार्थिनीवर लैगिक अत्याचार केले? पोलिसांनी केली अटक
20
Bihar Election JDU: चिराग पासवानांना नितीश कुमारांचा झटका; दावा केलेल्या जागांवरच उतरवले उमेदवार

मायक्रोफायनान्स कंपनींच्या विरोधात आक्रोश, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 16:49 IST

Morcha Kolhapur- मायक्रोफायनान्स कंपन्यांचे वसुली एजंट बेकायदेशीर पद्धतीने महिलांकडून वसुली करत आहे. ३१ मार्चपर्यंत बेकायदेशीर वसुली थांबवावी, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि महिला अत्याचार निवारण समितीच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला.

ठळक मुद्दे मायक्रोफायनान्स कंपनींच्या विरोधात आक्रोश जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

कोल्हापूर : मायक्रोफायनान्स कंपन्यांचे वसुली एजंट बेकायदेशीर पद्धतीने महिलांकडून वसुली करत आहे. ३१ मार्चपर्यंत बेकायदेशीर वसुली थांबवावी, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि महिला अत्याचार निवारण समितीच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला.

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी आले होते. त्यांच्यासमोर महिलांनी गाह्रणे मांडून मागण्यांचे निवेदन दिले. यावर मंत्री मुश्रीफ यांनी महिलांवर अन्याय होता कामा नये. फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी, आंदोलक प्रतिनिधी यांची बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले.रिपाईचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे म्हणाले, मायक्रोफायनान्स कंपन्यांनी सर्व सामान्य कष्टकरी महिलांना बेकायदेशीर भरमसाठ कर्ज देऊन त्यांचे जगणे मुश्किल केले आहे. या कर्जावर आकारलेले बेहिशेबी व्याज, दंडव्याज वसुली एजंटांचा चार्ज यामुळे महिलांना कर्जाच्या पाचपट रक्कम भरावी लागत आहे. जिल्हा प्रशासनकाडे ही बाब निदर्शनास आणूनही दखल घेतली जात नाही. यामुळे मायक्रोफायनान्स कंपनीकडून गोरगरीब महिल्यांचे आर्थिक शोषण सुरु आहे. अशा कंपनींच्या वसुली एजंटांवर वेसन घालावे.संजय गांधी निराधार योजना, देवदासी पेन्शन योजना, श्रावणबाळ योजना, अपंग पूर्नवसनाची पेन्शन दरमहा दोन हजार करावी. उत्पन्नाचा दाखला तहसिलदार यांना द्यावा. सर्व भूमीहीनांना प्रत्येकी पाच एकर जमिन राज्यशासनाने करण्यासाठी द्यावी. सक्तीने सुरु असलेली वीजबील ताबडतोब थांबवावी. अशा मागण्याही करण्यात आल्या. दरम्यान, घोषणाबाजी करत मोर्चा दसरा चौक, व्हिनस कॉर्नर मार्गी जिल्हाधिकारी कार्यालय असा काढण्यात आला. यावेळी महिला अत्याचार निवारण समिती अध्यक्षा रुपा वायदंडे, संजय जिरगे, दिलीप कोतळीवकर, बाजीराव जैताळकर आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Morchaमोर्चाkolhapurकोल्हापूर