कळंबा : गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला असून, बदलत्या हवामानामुुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच तुंबलेली गटारे, कचरा, कोंडाळी औषध फवारणीकडे झालेले दुर्लक्ष यांमुळेही विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे चित्र आहे. आधीच कोरोनाच्या धास्तीखाली नागरिक आहेत. त्यातच बदलत्या हवामानामुळे थंडी, ताप, सर्दी यांमुळे अनेकजण बेजार झाले आहेत. विशेषत: लहान मुले आणि वयोवृद्धांना संसर्गजन्य आजारांचा त्रास जाणवत आहे.
उपनगरात आजारांचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:58 IST