शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

निधी मागून आपलं रक्त आटलं : सतेज पाटील, सावित्रीबाई फुले रुग्णालयाचे नूतनीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 17:51 IST

राज्य सरकार आणि जिल्हा नियोजन समितीकडे विकासकामांसाठी निधी मागून आपलं रक्त आटलं. त्यामुळे यापुढील काळात नागरिकांना चांगल्या सुविधा द्यायच्या असतील तर आपणालाच काहीतरी तरतुदी केल्या पाहिजेत, अशा शब्दांत आमदार सतेज पाटील यांनी भाजप सरकारवर हल्ला चढविला.

ठळक मुद्देनिधी मागून आपलं रक्त आटलं : आमदार सतेज पाटीलमहानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयाचे नूतनीकरण

कोल्हापूर : राज्य सरकार आणि जिल्हा नियोजन समितीकडे विकासकामांसाठी निधी मागून आपलं रक्त आटलं. त्यामुळे यापुढील काळात नागरिकांना चांगल्या सुविधा द्यायच्या असतील तर आपणालाच काहीतरी तरतुदी केल्या पाहिजेत, अशा शब्दांत आमदार सतेज पाटील यांनी भाजप सरकारवर हल्ला चढविला.

उद्या हीच मंडळी आपल्याकडे निधी मागितलाच नाही म्हणतील तेव्हा महापौरांना माझी विनंती आहे की, त्यांनी निधी मागणीचे प्रस्ताव डीपीडीसी तसेच पालकमंत्री यांच्याकडे द्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले.महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयाचे नूतनीकरण, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा प्रारंभ तसेच सौरऊर्जा उपकरणांचा लोकार्पण असा संयुक्त कार्यक्रम पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ठेवण्यात आला होता; परंतु पालकमंत्री या कार्यक्रमास आले नाहीत. त्यामुळे आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर सरिता मोरे होत्या.कंपोनंट ब्लड बॅँकेसह सावित्रीबाई फुले रुग्णालयातील विविध सुविधांकरिता ‘डीपीडीसी’कडे निधीची मागणी केली; परंतु त्यांच्याकडून काही मिळाले नाही. त्यासाठी आपले रक्त आटले. त्यामुळे यापुढील काळात जर रुग्णांना चांगल्या सुविधा द्यायच्या असतील, तर महापालिकेच्या अर्थसंकल्पात जास्तीत जास्त तरतूद करावी. निधी देण्यासाठी तातडीने बैठक घ्या, असे आमदार पाटील म्हणाले.महापालिकेच्या वतीने शवगृहाची सोय करावी, सावित्रीबाई फुले रुग्णालयात सीसीटीव्ही बसवावेत, सीटीस्कॅ न मशीन घ्यावे, लहान मुलांचे आयसीयू सुरू करावे. त्यासाठी लागणाऱ्या अडीच कोटींच्या निधीचा प्रस्ताव डीपीडीसीकडे द्या, असेही त्यांनी सुचविले.महापौर मोरे यांनी सावित्रीबाई फुले रुग्णालयातील सुविधांचा स्तर उंचावला असल्याने त्याच्या नावलौकिकात भर पडली असल्याचे सांगितले; तर उपमहापौर भूपाल शेटे यांनी पैशाअभावी येथील सेवा व सुविधा थांबणार नाहीत याची आपणाला खबरदारी घेतली पाहिजे, असे सांगितले.

आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी रुग्णालयात दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती दिली. तसेच आयुष्यमान योजनेत सावित्रीबाईचा फुले रुग्णालयाचा समावेश करावा, यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तीन आॅपरेशन थिएटरसह अद्ययावत मशिनरी डोमलाईट, भुलीचे नवीन सयंत्र यासह हे रुग्णालय सुसज्ज झाल्याचेही डॉ. पाटील यांनी सांगितले.यावेळी स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख, शिक्षण समितीचे सभापती अशोक जाधव, परिवहन समितीचे सभापती अभिजित चव्हाण, माजी महापौर सागर चव्हाण, नगरसेवक डॉ. संदीप नेजदार, प्रा. जयंत पाटील, सचिन पाटील, विनायक फाळके उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Satej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूर