शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

गोरे बंधूसह तेरा जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

By admin | Updated: January 11, 2015 00:30 IST

बोथे स्फोट : एटीएसने केली घटनास्थळाची पाहणी

सातारा : माण तालुक्यातील बोथे जिलेटिन स्फोटप्रकरणी ‘बोथे विंड फार्मा डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘कमल एंटरप्रायजेस’वर सदोष मनुष्यवध तसेच भारतीय स्फोटके अधिनियमानुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती दहिवडी पोलीस ठाण्यातून देण्यात आली. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये ‘कमल एंटरप्रायजेस’चे संचालक शेखर, अंकुश, इरफान, राजेश तसेच ‘बोथे विंड फार्मा’चे अरविंद मन्सल, सूरज बारी, आशिष स्वरूप, आर. के. शर्मा, अरुण फूल, राजेंद्र व्हटकर, ए. प्रतिभान, राकेश विश्वकर्मा, अर्पित वाजपेयी यांचा समावेश आहे.माण तालुक्यातील बोथे येथे शुक्रवार, दि. ९ रोजी सकाळी नऊ वाजता झालेल्या जिलेटिन कांड्याच्या स्फोटात दादासाहेब जगदाळे, संदीप माने, शशिकांत कुलकर्णी हे ठार, तर जावेद मुलाणी, संदीप घाडगे, सूर्याजी शिंदे, शिवाजी सातव, बापू घाडगे हे जखमी झाले होते. बोथे घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. मात्र, स्फोट ज्या ठिकाणी झाला ते शेड ‘कंटिनम एनर्जी’, ‘बोथे विंड फार्मा’ की ‘कमल एंटरप्रायजेस’चे आहे, याचीच माहिती घेण्याचे काम सुरू होते. मात्र, हे शेड ‘कमल एंटरप्रायजेस’चे असून, येथील जिलेटिन ‘बोथे विंड फार्मा’ आणि ‘कमल एंटरप्रायजेस’चे असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली. या प्रकरणात दहिवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांनी स्वत: फिर्याद दिली असून, तेरा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास वडूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव करत आहेत. दरम्यान, शनिवारी येथे दहशतवादविरोधी पथक तथा ‘एटीएस’ आणि भारतीय स्फोटके संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आणि माहिती घेतली. रात्री उशिरापर्यंत दिल्ली येथून आलेले पथक दहिवडी पोलीस ठाण्यात या संबंधात माहिती घेत होते.संशयितांच्या शोधासाठी एलसीबीपोलीस उपाधीक्षक राहुल माकणीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार बोथे जिलेटिन स्फोट प्रकरणात शेखर गोरे, अंकुश गोरे यांच्यासह तेराजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये बोथे विंड फार्मा डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि कमल एंटरप्रायजेसचे संचालक तसेच कर्मचारी आहेत. यापैकी तीन कर्मचाऱ्यांना शुक्रवारीच चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली होती. तीन कर्मचारी अजूनही दहिवडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात असून, त्यांची नावे सांगण्यास मात्र पोलिसांनी नकार दिला. मात्र, ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांची माहिती काही प्रमाणात दहिवडी पोलिसांना उपलब्ध नाही. परिणामी त्यांच्या शोधासाठी सातारा स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके तयार करण्यात आली असून, ती विविध भागांमध्ये पाठविण्यात आली आहेत. ही पथके कोणत्या भागात पाठविण्यात आली आहेत, हे सांगण्यास पोलिसांनी नकार दिला. (प्रतिनिधी)