शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेश प्रक्रियेबाबत बैठक आयोजित करा; शिवसेना, युवासेनेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 17:01 IST

डोनेशन, बांधकाम शुल्क, शालेय साहित्य या माध्यमातून पालक व विद्यार्थ्यांची लूट शिक्षण सम्राटांकडून होत आहे. पालकांची लूट करणाऱ्या शाळा, महाविद्यालये बंद करा, अशी मागणी युवासेनेने शिक्षण उपसंचालकांकडे सोमवारी केली.

ठळक मुद्देडोनेशन घेणाऱ्या शाळा, महाविद्यालयांवरील कारवाईचा अहवाल द्याप्रवेश प्रक्रियेबाबत बैठक आयोजित करा; शिवसेना, युवासेनेचा शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मोर्चा

कोल्हापूर : डोनेशन, बांधकाम शुल्क, शालेय साहित्य या माध्यमातून पालक व विद्यार्थ्यांची लूट शिक्षण सम्राटांकडून होत आहे. पालकांची लूट करणाऱ्या शाळा, महाविद्यालये बंद करा, अशी मागणी युवासेनेने शिक्षण उपसंचालकांकडे सोमवारी केली.येथील शिक्षण संस्थांच्या मनमानी कारभाराविरोधात शिवसेना, युवासेनेच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी लाखो रुपयांचे डोनेशन आकारले जात आहे. काही ठरावीक शाळा तर उघडपणे डोनेशन घेत आहेत. यावर कोणती कारवाई कार्यालयाने केली, असा जाब आमदार राजेश क्षीरसागर यांनी यावेळी विचारला. त्यावर शिक्षण विभागाचे अधिकारी निरुत्तर राहिले.

डोनेशन घेणाऱ्या शाळा, महाविद्यालयांवर कोणती कार्यवाही करण्यात आली. त्याचा अहवाल येत्या दोन दिवसांत द्या, अन्यथा शिक्षण उपसंचालक कार्यालयास टाळे ठोकू, असा इशारा त्यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. प्र

वेश प्रक्रिया सुरूहोण्यापूर्वी लोकप्रतिनिधी, विद्यार्थी संघटना, शिक्षण विभागाशी निगडीत सर्व विभाग व अधिकारी आणि सर्वच शिक्षण संस्थांचे प्रमुख यांची संयुक्तिक बैठक आयोजित करावी, अशा सूचना आमदार क्षीरसागर यांनी दिल्या. त्यावर साहाय्यक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांनी तक्रार असलेल्या शाळांना नोटीस काढली जाईल. गेल्या दोन वर्षांतील कारवाईचा अहवाल तातडीने दोन दिवसांत देण्याबाबतची ग्वाही दिली.

दरम्यान, साहाय्यक शिक्षण संचालक चौगुले, महानगरपालिका प्रशासन अधिकारी एस. के. यादव यांनी निवेदन स्वीकारले. या आंदोलनात शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, दीपक गौड, युवासेनेचे योगेश चौगुले, अविनाश कामते, चेतन शिंदे, विश्वजित साळोखे, जयवंत हारुगले, किशोर घाटगे, सुनील जाधव, तुकाराम साळोखे, रणजित जाधव, आदी सहभागी झाले.

घोषणा देत निदर्शनेशिक्षण सम्राट आणि शिक्षण खात्याच्या भ्रष्टाचारी कारभाराविरोधात आंदोलनकर्त्यांनी घोषणा देऊन निषेध व्यक्त केला. मोर्चाच्या अग्रभागी शिक्षणसम्राटांचा राक्षस पालक, विद्यार्थ्यांच्या गळ्यावर सुरी ठेऊन लूट करीत असल्याचा देखावा सादर करण्यात आला.

 

 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाkolhapurकोल्हापूरMorchaमोर्चा