लोकमत न्यूज नेटवर्क
कळे : भारतीय सैनिक मातृभूमीच्या रक्षणासाठी अमुल्य असा त्याग करतच असतो, त्याचबरोबर समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, याचे भान सैनिकांना नेहमीच असते. या जाणिवेतून निर्माण झालेली पुनाळमधील वीर जोत्याजी केसरकर आजी-माजी सैनिक संघटना समाजाला योग्य दिशा देण्याचे काम निश्चितच करेल, असे प्रतिपादन कर्नल संजीव सरनाईक यांनी केले. ते पुनाळ (ता. पन्हाळा) येथे वीर जोत्याजी केसरकर आजी-माजी सैनिक संघटनेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी कर्नल संजीव सरनाईक यांच्या हस्ते नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले. संघटनेचे उपाध्यक्ष व सेवानिवृत्त ऑनररी कॅप्टन अशोक पोवार यांनी प्रास्ताविक केले. सरदार काळे यांनी सूत्रसंचालन केले.
जिल्हा सैनिक अधिकारी शिवाजी पोवार, निवृत्त हवालदार चंद्रहार पाटील, जिल्हा सैनिकचे नंदकुमार चावरे, वीर जोत्याजी केसरकर यांचे वारस सरदार पाटील (केसरकर) यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सरपंच युवराज पाटील, माजी सरपंच भगवान पांडुरंग पोवार, पन्हाळा पंचायत समितीचे माजी उपसभापती नारायण सुतार, माजी पोलीसपाटील शामराव पाटील, संघटनेचे अध्यक्ष श्रीपती बोळावे, साताराचे अधीक्षक अशोक पांडुरंग पोवार, संघटनेचे खजानिस निवास गणपती बोळावे, संघटनेचे सचिव विठ्ठल गुंडू पाटील, डॉ. हिरालाल शिंदे, तानाजी शिंदे, बाबुराव पोवार, धनाजी चव्हाण, नंदकुमार चौगले, सरदार साळोखे, शिवाजी डवंग, सरदार मगदुम, पांडुरंग मगदुम आदी उपस्थित होते.
१) पुनाळ (ता. पन्हाळा) येथे वीर जोत्याजी केसरकर आजी-माजी सैनिक संघटनेच्या नामफलकाचे अनावरण कर्नल संजीव सरनाईक यांनी केले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष श्रीपती बोळावे, संघटनेचे उपाध्यक्ष व जिल्हा सैनिक साताराचे अधीक्षक अशोक पांडुरंग पोवार, संघटनेचे खजानिस निवास गणपती बोळावे, संघटनेचे सचिव विठ्ठल गुंडू पाटील, सरपंच युवराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.