शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

५० लाखांची गॅरंटी भरण्याचा कोल्हापूर पालिकेला आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 21:38 IST

शहरातील रंकाळा तलाव आणि पंचगंगा नदी प्रदूषणासंदर्भात मार्गदर्शक सूचनांची पूर्तता केल्यासंबंधीचा अहवाल वेळेत सादर केला नाही म्हणून बुधवारी राष्ट्रीय हरित लवादाने कोल्हापूर

ठळक मुद्देराष्ट्रीय हरित लवादाची कारवाई : अहवाल सादर केला नसल्याने ५ लाखांचा दंड

कोल्हापूर : शहरातील रंकाळा तलाव आणि पंचगंगा नदी प्रदूषणासंदर्भात मार्गदर्शक सूचनांची पूर्तता केल्यासंबंधीचा अहवाल वेळेत सादर केला नाही म्हणून बुधवारी राष्ट्रीय हरित लवादाने कोल्हापूर महानगरपालिका तसेच महाराष्ट राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळास प्रत्येकी पाच लाखांचा दंड तसेच महानगरपालिकेला पन्नास लाखांची परफॉर्मन्स गॅरंटी (कामगिरीची हमी) भरण्याचा आदेश दिला. दंडाची तसेच परफॉर्मन्स गॅरंटीची रक्कम केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे भरावी लागणार आहे.

दिल्लीतील राष्ट्रीय हरित लवादाच्या चार न्यायाधीशांसमोर बुधवारी पुणे येथून व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी झाली. त्यावेळी लवादाने ही कारवाई केली. गेल्या महिन्यात झालेल्या सुनावणीवेळी महानगरपालिका तसेच महाराष्ट प्रदूषण नियंत्रण मंडळाने लवादाने केलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार कामगिरीचा अहवाल मुदतीत सादर केला नव्हता.

त्यामुळे लवादाने महानगरपालिका व महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना पंधरा दिवसांच्या आत प्रत्येकी पाच लाख रुपये दंड तसेच महापालिका प्रशासनास ५० लाखाची परफॉर्मन्स गॅरंटी भरण्याचे आदेश दिले.मार्गदर्शक सूचनेकडे दुर्लक्ष करणे पडले महागात रंकाळा तलाव प्रदूषणासंदर्भात महानगरपालिकेच्या विरोधात राष्ट्रीय हरित लवादासमोर येथील कार्यकर्ते सुनील केंबळे यांनी खटला दाखल केला आहे. या खटल्यात पंचगंगा नदी प्रदूषणाचा मुद्दाही लवादाने समाविष्ट करून घेतला आहे.

या खटल्याच्या सुनावणीदरम्यान लवादाने काही मार्गदर्शक सूचना महापालिका प्रशासन व प्रदूषण नियंत्रण महामंडळाला केल्या आहेत तसेच प्रत्येक महिन्याला प्रदूषण रोखण्याबाबतच्या उपाययोजनांची माहिती लवादाला द्यायचे बंधन घातले आहे तरीही महानगरपालिका प्रशासनाने केलेल्या कामगिरीचा अहवाल लवादासमोर वेळेत सादर केला नाही. ही बाब तशी गंभीर आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषणkolhapurकोल्हापूर