शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: राधानगरी धरणाला वक्रकार दरवाजे बसविण्यास विरोध, शाहूकालीन जलविद्युत केंद्र सुरू करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 18:57 IST

धरण स्थळावरील जुने वीज निर्मिती केंद्र २०१७ पासून बंद

राधानगरी : राधानगरीधरणावर नवीन संडवा बांधकाम करणे व सेवा द्वारांची दुरुस्ती, पूर नियंत्रण संबंधात शुक्रवारी राधानगरी पंचायत समिती येथे खासदार शाहू छत्रपती, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभिजीत म्हेत्रे, कार्यकारी अभियंता स्मिता माने यांच्यासह स्थानिक प्रतिनिधी व नागरिक यांच्यामध्ये सल्लामसलत कार्यशाळा झाली. राधानगरीतील नागरिकांनी धरणाला नवीन वक्रकार दरवाजे बसविण्यास तीव्र विरोध करत शाहूकालीन जुने वीज निर्मिती केंद्र तत्काळ सुरू करावे, अशी प्रमुख मागणी केली.धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धरणाची विसर्ग क्षमता वाढविण्यासाठी, पूर नियंत्रण करण्यासाठी तांत्रिक बाबी लक्षात घेता, नवीन वक्र दरवाजे बसविणे गरजेचे असल्याचे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभिजीत म्हेत्रे यांनी स्पष्ट केले. २००५ साली राधानगरी धरणाचे एक सेवाद्वार अडकून बसल्याचा प्रसंग घडला. या घटनेला आज वीस वर्षे पूर्ण झाली. तरीही या सेवा द्वारांची कोणतीही दुरुस्ती का केला नाही, असा प्रश्न गोकुळ संचालक अभिजीत तायशेटे यांनी उपस्थित केला. धरण स्थळावरील जुने वीज निर्मिती केंद्र २०१७ पासून बंद आहे, ते तत्काळ सुरू करून जर संपदा विभागाने या जलविद्युत केंद्रास पाणी देण्यास मान्यता द्यावी, असे मत नंदकिशोर सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. दीपक शेट्टी, सुहास निंबाळकर, अनिल बडदारे यांनी प्रश्न उपस्थित केले. बैठकीस जागतिक बँकेचे प्रतिनिधी मेघा कश्यप, उपविभागीय अधिकारी प्रवीण पारकर, समीर निरुखे, मोहन पाटील, फारूक नावळेकर उपस्थित होते.

धरण स्थळावरील जुन्या वीज निर्मिती केंद्राचा विषय जलसंपदा विभागाने प्राधान्याने घेऊन जुने वीज निर्मिती केंद्र तत्काळ सुरू करावे. -शाहू छत्रपती, खासदार