शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

नोटाबंदी विरोधात कॉँग्रेस  रस्त्यावर, कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 17:50 IST

भाजप सरकारने दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्व घटकांचे नुकसान झाले आहे; त्यामुळे ही नोटाबंदी नेमकी कोणासाठी झाली, त्याचे लाभार्थी कोण? काळा पैसा किती जमा झाला? अशी विचारणा करत कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणांनी परिसर दणाणला. नोटाबंदी करून सरकारने देशाला भिकेला लावल्याची टीकाही यावेळी पदाधिकाऱ्यांनी केली.

ठळक मुद्देनोटाबंदी विरोधात कॉँग्रेस  रस्त्यावर, कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनेनोटाबंदी करून देशाला भिकेला लावले, जोरदार घोषणांनी परिसर दणाणला

कोल्हापूर : भाजप सरकारने दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्व घटकांचे नुकसान झाले आहे; त्यामुळे ही नोटाबंदी नेमकी कोणासाठी झाली, त्याचे लाभार्थी कोण? काळा पैसा किती जमा झाला? अशी विचारणा करत कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणांनी परिसर दणाणला. नोटाबंदी करून सरकारने देशाला भिकेला लावल्याची टीकाही यावेळी पदाधिकाऱ्यांनी केली.दुपारी बाराच्या सुमारास शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड. सुरेश कुराडे यांच्या नेतृत्वाखाली निषेधाचे फलक व पक्षाचे झेंडे घेतलेले कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र आले. यानंतर नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. मोदी सरकारचे करायचे काय?, मोदी सरकार हाय हाय? अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. ‘सत्ताधाऱ्यांचा काळा पैसा पांढरा झाला’, ‘नोटाबंदी स्वतंत्र भारतातील मोठा घोटाळा’, ‘मोदीजी देशाची माफी मागा’ अशा लक्षवेधी फलकांद्वारे निषेध करण्यात आला.यावेळी नोटाबंदीचा निर्णय घेऊन भाजप सरकारने देशाला भिकेला लावल्याची टीका कुराडे व चव्हाण यांनी केली.दरम्यान, निवेदनाद्वारे नोटाबंदीने फायदा झालेले खरे लाभार्थी कोण? हे जाहीर करावे, चलनातून रद्द झालेल्या नोटांपैकी ९९.३ टक्के नोटा बॅँकेत जमा झाल्या, मग आता काळा पैसा कोठे आहे, हे स्पष्ट करावे, वाढणाऱ्या  महागाईबद्दल असह्य का आहे?, डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीबाबत काय प्रतिक्रिया आहे? आंतरराष्ट्रीय  बाजारपेठेत क्रुड तेलाचे दर उतरले असताना सध्या बाजारातील पेट्रोल व डिझेलचे दर का कमी होत नाहीत? असे विविध प्रश्न सरकारला विचारण्यात आले आहेत.आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य बजरंग पाटील, महापालिका सभागृह नेता दिलीप पोवार, महिला बाल कल्याण समिती सभापती सुरेखा शहा, नगरसेवक तौफिक मुल्लाणी, नगरसेविका वृषाली कदम, दीपा मगदूम, वनिता देठे, करवीर पंचायत समिती सभापती प्रदीप झांबरे, विक्रम जरग, रंगराव देवणे, संजय पोवार-वाईकर, एस. के. माळी, संपतराव चव्हाण, बयाजी शेळके, महंमदशरीफ शेख, नारायण लोहार, सुभाष सातपुते, दीपक थोरात, पार्थ मुंडे, दुर्वास कदम, विजयसिंह माने, दिग्विजय देसाई, आनंदा करपे, आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 

 

टॅग्स :congressकाँग्रेसkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी