शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

भेसळखोरांवर कारवाईचे जाळे

By admin | Updated: May 26, 2015 00:49 IST

अन्न-औषधचा धडाका : ४४५ कारवाया; दोन कोटींचा माल जप्त

गणेश शिंदे -कोल्हापूरगेल्या वर्षभरात भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाईचा धडाका लावला आहे. जिल्ह्यात या विभागाने वर्षात केलेल्या ४५५ कारवायांत एक कोटी ८३ लाख ४० हजार ३३ रुपयांचा भेसळ, गुणवत्ताविरहित, हानीकारक असा विविध प्रकारचा मुद्देमालही जप्त केला. या कारवाईची भेसळखोरांनी धास्ती घेतली असली तरी भेसळीचे रॅकेट खूप मोठे असल्याने हा धडाका कायम ठेवावा लागेल. वर्षभरात या विभागाने जिल्ह्यात गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू, मावा आदी ५६ प्रकरणांमधून एक कोटी ५७ लाख तीन हजार ४७७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. इतर अन्नपदार्थांच्या २२ प्रकरणांत २६ लाख ३६ हजार ५५६ रुपये असा एकूण एक कोटी ८३ लाख ४० हजार ३३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दुसरीकडे, अन्न नमुन्याच्या ३६७ प्रकरणांत चार लाख आठ हजार ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली. त्यामध्ये ३० नमुने हे खाद्यपदार्थांशी संबंधित होते. ३५ नमुने हे कमी दर्जाच्या खाद्यपदार्थांशी संबंधित होते, तर नऊ नमुने हे खाद्यपदार्थांच्या पॅकेजवर खोट्या जाहिराती करणारे होते. १२ प्रकरणात ज्यांची उलाढाल साडेबारा लाख रुपयांपर्यंत आहे अशांकडून एक लाख ५७ हजार ५०० रुपये दंड तर साडेबारा लाखांवर उलाढाल असणाऱ्या ३५ प्रकरणांमधून एक लाख ५१ हजार ५०० रुपये दंडाची वसुली करण्यात आली. ज्यांची उलाढाल साडेबारा लाख रुपये होती त्यांच्यावर पुण्यातील कार्यालयामध्ये अन्न सुरक्षा मानके ७४ कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुळासाठी जनजागृतीकोल्हापूरचा गूळ आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जाण्याच्या उद्देशाने गूळ उत्पादक, गुऱ्हाळघरे, शेतकरी व शेतकरी संघटनांबरोबर सप्टेंबर महिन्यापासून प्रत्येक तालुकानिहाय प्रशिक्षण जनजागृती कार्यक्रम घेणार आहे. त्यानंतरही गुळात कृत्रिम रंग मिसळून त्याची विक्री करणाऱ्यांवर चाप बसविण्यासाठी प्रशासन कडक कारवाईची पावले उचलणार आहे.राज्यात कोल्हापूर जिल्हा कारवाईमध्ये अग्रेसर आहे. ग्राहकांना स्वच्छ, उत्तम प्रतीचा व दर्जाचा गूळ मिळावा यासाठी आता गूळ उत्पादक व शेतकऱ्यांचा जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे, पण कृत्रिम गुळाची विक्री करत असेल तर कारवाईचा बडगा उगारला जाईल.- संपत देशमुख, सहाय्यक आयुक्त (अन्न) अन्न व औषध प्रशासन विभाग, कोल्हापूर.कोल्हापूर विभागावर प्रकाशझोत...तीन सहाय्यक आयुक्त (दोन अन्न व एक औषधासाठी)पाच अन्न सुरक्षा अधिकारी तीन कर्मचारीअसुरक्षित दर्जाचे शीतपेय विक्री केल्याप्रकरणी एकावर अन्न सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. सध्या हा खटला न्यायालयात आहे. हा गुन्हा सिद्ध झाल्यास संबंधिताला सहा महिने सक्तमजुरी व एक लाख रुपयांच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे....तरच तस्करीला आळा परराज्यांतून गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची राजरोसपणे विक्री होत असल्याचे यापूर्वी झालेल्या कारवाईमधून उघड झाले आहे. त्यामुळे या विभागाला कारवाई करण्यास अडचणी येतात. त्यासाठी सांगली, सोलापूर व कोल्हापूर या सीमामार्गावर अन्न व औषध विभागाने तपासणी नाका केला तरच अशा तस्करीला आळा बसेल. जप्त अन्नपदार्थरंगवलेला चहा - १६ लाख ६३ हजार ७१९ रुपये रंगवलेला फरसाणा - ५ लाख ५० हजार ६८० रुपयेकमी दर्जाचे पनीर - ७ हजार ८४० रुपये मित्ता छाप - ७० हजार ९९२ रुपयेमिनरल वॉटर - १ लाख ७० हजार ८७९ रुपयेखवा - ५६ हजार ५५० रुपयेबनावट खाद्यतेल - १ लाख १४ हजार ८९८ रुपये