शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

कोल्हापुरातील भूमी अभिलेख कार्यालयात खुलेआम लूट, लाच गोळा करणारे प्रशासकीय रॅकेट कार्यरत

By भीमगोंड देसाई | Updated: January 4, 2024 14:00 IST

भीमगोंडा देसाई  कोल्हापूर : जिल्हा, शहर, तालुका भूमी अभिलेख कार्यालयात कामानिमित्त आलेल्यांना चप्पल तुटेपर्यंत हेलपाटे मारायला लावून त्यांच्या खिशातील ...

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : जिल्हा, शहर, तालुका भूमी अभिलेख कार्यालयात कामानिमित्त आलेल्यांना चप्पल तुटेपर्यंत हेलपाटे मारायला लावून त्यांच्या खिशातील पैशावर खुलेआम दरोडा टाकणारे रॅकेट सक्रिय आहे. लिपिक, अधीक्षक ते साहेब अशी लाचेच्या पैशाची वाटणी होत असल्याने तक्रारदाराला कोणाकडेही न्याय मिळत नाही, अशा तक्रारी आहेत. शेवटी मागेल त्या पैशात तडजोड करून लाच द्यायची आणि काम करून घ्यायची वेळ त्याच्यावर येत आहे. या व्यवस्थेवर जिल्हा भूमीअभिलेख अधीक्षक सुदाम जाधव, त्यांचे चालक उदय शळके हे १५ हजारांची लाच घेताना नुकतेच सापडल्याने शिक्कामोर्तब झाल्याचा आरोप होत आहे.भूमी अभिलेख कार्यालयात सीटी सर्व्हे असलेल्या गावातील मालमत्ता पत्रकावर वारसा नोंद करणे, बोजा नोंद करणे, कमी करणे, मालमत्तेची फाळणी करणे, जमीन, प्लॉट मोजणी करणे, हद्द निश्चित करणे, सनद वितरण करणे, जमीन मोजणीसाठीचे पैसे भरून घेणे, प्लॉट, जमीन मोजणे, हद्दीवरून वाद, तक्रारी असतील तर त्याची सुनावणी घेऊन निकाल देणे अशी प्रमुख कामे केली जातात. या कामांसाठी अर्ज देण्यासाठी गेल्यानंतर नसलेल्या कागदपत्राची विचारणा करून हेलपाटे मारायला लावले जाते. त्यातून कमीत कमी एक हजार ते मालमत्ता किमती असेल तर अर्ध्या लाखांपर्यंत लाच घेतली जाते. कोणाचीही भीडभाड न ठेवता कार्यालयात बसूनच लाच गोळा करण्यापर्यंतचे धाडस लाचखोरांचे गेले आहे. 

शासकीय शुल्क ऑनलाइन, लाच ऑफलाइन..मोजणीसाठीचे शुल्क ऑनलाइन भरून घेतले जाते. मात्र लाचेची रक्कम ऑफलाइन घेतली जाते. लाचेची सर्व रक्कम इमानेइतबारे आणून देईल, याचा विश्वास वाटत नसल्याने लिपिक, साहेब स्वत:च़ कार्यालयात आणि आवारात पैसे घेत आहेत. कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे असतील तर कॅमेरे बंद करून किंवा कॅमेऱ्याची नजर जात नाही, अशा ठिकाणी जाऊन पैसे स्वीकारले जात आहेत. या लुटीत अपवाद वगळता लिपिक ते साहेब सर्वच सहभागी असल्याने तक्रार झाली तर दोषींना शिक्षा होत नसल्याचे चित्र आहे.

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष का ?शहर, जिल्हा, तालुका कार्यालय आमदार, खासदारांच्या कार्यक्षेत्रातच येतात. कार्यालयात कोणत्या कामासाठी किती लाच द्यावी लागते, हे जगजाहीर आहे. तरीही अजूनपर्यंत एक आमदार, खासदाराने येथील लुटीच्या विरोधात जाहीरपणे भूमिका घेतलेली नाही. परिणामी लुटीचा हिस्सा प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे वरिष्ठांपर्यंत ‘प्रोटोकॉल’च्या माध्यमातून जातो म्हणून भूमी अभिलेखमधील भ्रष्टाचाराला अभय मिळत असल्याचीही सामान्यांची भावना झाली आहे.

सीटी सर्व्हेच्या हद्दीतील वारसा नोंदीसाठीही हलपाटे मारायला लावून लाचेची अपेक्षा ठेवली जाते. जमीन मोजणीसाठी रीतसर पैसे मोजून अर्ज केले तरी वेळेवर मोजणी केली जात नाही. मोजणी केली तरी हद्दीवरून भांडणे लावून त्यातून पैसे उकळले जातात. अशा भ्रष्ट कारभाराविरोधात प्रसंगी आक्रमक होऊन जाब विचारला जाईल. - राजेंद्र गड्ड्यान्नावर, राज्य सचिव, स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :kolhapurकोल्हापूर