शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

जलतरण तलाव खुला करा ; जिल्हा क्रीडाअधिकारी आंदोलकांमध्ये हमरीतुमरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 17:54 IST

Swimming, Kolhapurnews छत्रपती शिवाजी स्टेडियम येथील शासनाचा जलतरण तलाव खुला करावा या मागणीसाठी सोमवारी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीतर्फे येथे आंदोलन करण्यात आले. मात्र यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी तलाव खुला असून आंदोलन बेकायदेशीर असल्याचा दावा केला. यारून आंदोलक आणि डॉ. साखरे यांच्यामध्ये चांगलीच तू तू में में झाली.

ठळक मुद्देजलतरण तलाव खुला करा ; जिल्हा क्रीडाअधिकारी आंदोलकांमध्ये हमरीतुमरीशहर व जिल्हा नागरिक कृती समितीचे अनोखी आंदोलन

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी स्टेडियम येथील शासनाचा जलतरण तलाव खुला करावा या मागणीसाठी सोमवारी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीतर्फे येथे आंदोलन करण्यात आले. मात्र यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी तलाव खुला असून आंदोलन बेकायदेशीर असल्याचा दावा केला. यारून आंदोलक आणि डॉ. साखरे यांच्यामध्ये चांगलीच तू तू में में झाली.अनलॉकच्या विविध टप्यांमध्ये जलतरण खुला करण्यास शासनाने मान्यता दिली होती. त्यानुसार शहरातील शासनाचा एकमेव जलतरण खुला करण्याची मागणी करण्यात आली होती. 

क्रीडा कार्यालयातर्फे १ डिसेंबर रोजी तलाव खुला करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्याप तलाव खुला न झाल्याचा आरोप करत कृती समितीतर्फे सोमवारी दुपारी घोषणाबाजी करत तलावामध्ये प्रवेश करण्यात आला. तर त्यांच्या सोबतच्या खेळाडूंनी तलावामध्ये जलतरणाचा सराव केला.

यावेळी जिल्हा क्रीडाअधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे दाखल झाले. त्यांनी शासनाच्या नियमावली नुसार १ डिसेंबर रोजी तलाव खुला करण्यात आल्याचा दावा केला. यावरून आंदोलक आणि जिल्हा क्रीडाअधिकारी साखरे यांच्यामध्ये शाब्दिक वाद रंगाला. तलाव सुरू असताना तसेच कोणतीही पूर्व कल्पना न देता करण्यात आलेले हे आंदोलनच बेकायदेशीर असल्याची भूमीका घेतली.

कृती समितीचे रमेश मोरे आणि अशोक पोवार यांनी आंदोलन बेकायदेशी असल्यास गुन्हा दाखल करून कारवाई करा.त्यांनतर तलाव खुला करण्याबाबतचे निवेदन क्रिडा अधिकारयांकडे देण्यात आले. तर शासनाच्या नियमावली नुसार तलाव खुला असल्याचे पत्र देण्याचे क्रिडा अधिकारयांनी मान्य केले. त्यानंतर आंदोलक शांत झाली.आंदोलनात संभाजीराव जगदाळे, राजेश वरक, श्रीकांत भोसले, रामदास भाले, महादेव जाधव, चंद्राकांत पाटील, कादर मलबारी, रामभाउ कोळेकर, दिग्वीजय साळोखे, विजय पाटील, श्रीवर्धन पाटील, आस्मीता म्हाकवे, अनुष्का भोसले, धैर्यशील भोसले, पंडीत ठमके, गिरीजा मोरे, हार्षाली मोरे, श्रीधन जाधव, अंजूम देसाई, राजेंद्र कोतमिरे, महेश जाधव आदींनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला. 

टॅग्स :Swimmingपोहणेkolhapurकोल्हापूर